Twinkle Khanna | फक्त ‘हा’ अट्टहास पूर्ण करण्यासाठीच ट्विंकल खन्ना हिने केले अक्षय कुमार याच्यासोबत लग्न, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
बाॅलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांमध्ये धमाल करताना दिसत नाहीये. अक्षय कुमार याच्यासोबत लग्न झाल्यापासून ट्विंकल खन्ना ही बाॅलिवूडपासून दूर गेलीये. मात्र, असे असतानाही ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत असून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही सोशल मीडियावर ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ही प्रचंड सक्रिय दिसते. 2001 मध्ये अक्षय कुमार याच्यासोबत लग्न केल्यापासूनच ट्विंकल खन्ना ही चित्रपटांपासून दूर गेलीये. ट्विंकल खन्ना ही सध्या लंडनमध्ये अभ्यास करत आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विंकल खन्ना हिने एक व्हिडीओ (Video) शेअर करत मोठा खुलासा केला होता की, मी या वयात शिक्षणाचे धडे घेत असून काॅलेज लाईफ जगत आहे. विशेष म्हणजे ट्विंकल खन्ना हिचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूप जास्त आवडला होता. ट्विंकल खन्ना ही नेहमीच तिच्या पर्सनल लाईफबद्दल (Personal life) माहिती शेअर करताना दिसते.
आज संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात फादर्स डे साजरा केला जातोय. अनेकांनी आपल्या वडिलांसोबतचे फोटो शेअर करत पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, यादरम्यान ट्विंकल खन्ना हिने एक मोठा खुलासा केला आहे. ट्विंकल खन्ना हिने अनेक वर्षांनंतर थेट अक्षय कुमार याच्यासोबत लग्न करण्याचे कारण सांगत खुलासा केला आहे.
ट्विंकल खन्ना हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अक्षय कुमार याच्यासोबतचा फोटोही शेअर केला आहे. अखेर ट्विंकल खन्ना हिने अक्षय कुमार याच्यासोबत लग्न करण्याचे खरे कारण जगासमोर सांगितले आहे. ट्विंकल खन्ना हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, खिलाडी कुमार याच्यासोबत लग्न करण्याच्या कारणांपैकी एक म्हणजे…
मी त्याला माझ्या कुटुंबियांसोबत एक चांगला व्यवहार करताना बघितले होते, त्यावेळीच मी विचार केला की, हा नक्कीच चांगला बाप बनेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलाला याचे जीन्स मिळतील. खरोखरच याची मुले भाग्यवान आहेत की, त्यांना काही गोष्टी या अनुवांशिकतेने मिळाल्या आहेत. नेहमीच तो स्वत:च्या अगोदर त्याच्या मुलांना ठेवतो आणि तो खूप जास्त चांगला फादर आहे.
ही पोस्ट शेअर करत ट्विंकल खन्ना हिने अक्षय कुमार याला फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विंकल खन्ना हिने अखेर अक्षय कुमार याच्यासोबत लग्न करण्याचे थेट कारण सांगून टाकले आहे. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट सतत बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षयचा सेल्फी चित्रपट रिलीज झाला होता.