‘उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’; महेश कोठारेंची नवी पौराणिक मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवर बऱ्याच काळानंतर नवी पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश कोठारे या भव्य मालिकेची निर्मिती करणार आहेत. 'उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची' असं या मालिकेचं नाव आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

'उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची'; महेश कोठारेंची नवी पौराणिक मालिका
Mahesh KothareImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 10:48 AM

‘विठुमाऊली’ आणि ‘दख्खनचा राजा जोतिबा’च्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनीवर नवी पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं नाव आहे ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’. देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ‘कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही निर्मिती संस्था या भव्य मालिकेची निर्मिती करणार आहे. निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते ‘उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या मालिकेचा मुहूर्त सोहळा पार पडला. याप्रसंगी महेश कोठारे म्हणाले, “स्टार प्रवाह वाहिनीसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. ‘मन उधाण वाऱ्याचे’ ही पहिली मालिका स्टार प्रवाहसोबत केली होती. त्यानंतर ‘विठुमाऊली’, ‘दख्खनचा राजा जोतिबा’, ‘पिंकीचा विजय असो’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ अशा सुपरहिट मालिका केल्या. ‘उदे गं अबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या मालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा उलगडण्यात येणार आहे.”

हे सुद्धा वाचा

पहा प्रोमो-

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

“ही मालिकाही भव्यदिव्य असेल यात शंका नाही. या भव्यदिव्य मालिकेतून कोणकोणते कलाकार भेटीला येणार? सेट कसा असेल? याविषयी प्रेक्षकांना लवकरच कळेल. या नव्या प्रोजेक्टसाठी प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळावेत हीच इच्छा व्यक्त करेन,” असं ते पुढे म्हणाले. या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘बऱ्याच दिवसांनंतर स्टार प्रवाहवर देवीची मालिका पहायला मिळणार’, असं एकाने लिहिलंय. तर ‘या मालिकेविषयी बरीच उत्सुकता आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. प्रोमो पाहून अनेकांनी ही मालिका बघण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.

'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.