Umesh Kamat: ‘एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे..’; उमेश-हृताची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

उमेश कामत (Umesh Kamat) आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) यांची सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. उमेशने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ही स्टोरी लिहिली असून तीच स्टोरी हृतानेही शेअर केली आहे.

Umesh Kamat: 'एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे..'; उमेश-हृताची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत
Umesh Kamat and Hruta DurguleImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 10:17 AM

अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) यांची सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. उमेशने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ही पोस्ट लिहिली असून तीच स्टोरी हृतानेही शेअर केली आहे. या दोघांच्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ (Dada Ek Good News Aahe) या नाटकासंदर्भातील ही पोस्ट आहे. ‘एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे रविवारी 5 जूनचा चिंचवड येथील ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटकाचा प्रयोग रद्द’, अशी पोस्ट उमेशने लिहिली आहे. उमेशची हीच पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अत्यंत हटके प्रमोशनमुळे चर्चेत आलेलं उमेश-हृताचं हे नाटक चांगलंच गाजलं. नाट्यरसिकांचा या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना काळानंतर जेव्हा नाट्यगृहे पुन्हा सुरू झाली, तेव्हा रसिकांनी पुन्हा एकदा नाट्यगृहात हे नाटक पाहण्यासाठी गर्दी केली. येत्या 5 जून रोजी चिंचवडमध्ये या नाटकाचा प्रयोग होणार होता. मात्र आता राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामुळे हा प्रयोग रद्द केल्याचं समजतंय.

‘प्रेक्षकांचे तिकिटांचे पैसे परत करण्यात येतील’, असंही उमेशने त्याच्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं. ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकात उमेश आणि हृताने भाऊ-बहिणीची भूमिका साकारली आहे. उमेश या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका साकारत असून, हृता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे. हृताचं हे रंगभूमीवरील पहिलंच व्यासायिक नाटक आहे.

उमेशची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

प्रिया बापट आणि उमेशने मिळून या पहिल्यावहिल्या नाटकाची निर्मिती केली आहे. नाट्यरसिकांनाही या नाटकाची फार उत्सुकता होती. मात्र आता प्रयोग रद्द झाल्याने त्यांचीही निराशा झाली आहे. सोनल प्रॉडक्शन निर्मित आणि कल्याणी पाठारे लिखित या नाटकाचं दिग्दर्शन अद्वैत दादरकरने केलंय. या नाटकाच्या प्रमोशनच्या वेळी मुंबई-पुण्यात ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ असे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.