Bollywood | अभिनेत्याचा ‘तो’ निर्णय चुकलाच! टॉयलेट साफ करण्याची आलेली वेळ
Bollywood | यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्याने घेतलेला मोठा निर्णय, अभिनेत्याने टॉयलेट साफ करण्यासोबतत केली अनेक कामे, कारण...; बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, जे त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खसगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहीले.
मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. चाहत्यांनी अभिनेत्यांना डोक्यावर देखील घेतलं. पण यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने एका मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे तुफान चर्चा रंगली. सध्या ज्या अभिनेत्याची चर्चा रंगत आहे, ते दुसरे तिसरी कोणी नसून अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) आहेत. विनोद खन्ना आज जिवंत नसले तरी, त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. विनोद खन्ना यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.
विनोद खन्ना यांच्या फिल्मि करियरबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘ मन के मीत’ सिनेमाच्या माध्यमातून करियरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. एवढंच नाही तर, अनेक सिनेमांमध्ये विनोद खन्ना यानी सहाय्यक अभिनेता म्हणून देखील रुपेरी पडद्यावर काम केलं. विनोद खन्ना यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाच्या भूमिकेला देखील न्याय दिलं.
‘पूरब और पश्चिम’, ‘सच्चा झूठा’, ‘आन मिलो सजना’, ‘मस्ताना’ आणि ‘मेरा गांव मेरा देश’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारत विनोद खन्ना चाहत्यांचं मनोरंजन केलं. विनोद खन्ना आज देखील त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत विनोद खन्ना यांनी स्क्रिन शेअर कली.
यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी घेतला मोठा निर्णय
यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी मोठा निर्णय घेतला. १९८२ रोजी विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. दरम्यान, विनोद खन्ना गुरू ओशो रजनीश यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेला गेले आणि त्यांनी संन्यास घेतला होता. आश्रमातील त्यांचे अनेक फोटो देखील समोर आले होते. एवढंच नाहीतर, पुणे याठिकाणी असलेल्या ओशोंच्या आश्रमात देखील विनोद खन्ना जायचे.
आश्रमात विनोद खन्ना माळी म्हणून काय करायचे एवढंच नाही तर, आश्रमात अभिनेते टॉयलेट साफ करण्यासोबतच अन्य कामे देखील करायचे. दरम्यान १८८६ मध्ये अमेरिकन सरकारने आश्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. आश्रम बंद झाल्यानंतर विनोद खन्ना पून्हा भारतात आले. मायानगरीत पोहोचल्यानंतर त्यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण शेवटपर्यंत विनोद खन्ना आश्रममध्ये जायचे.
चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर विनोद खन्ना यांनी अनेक सिनेमांमध्ये कामम केले. त्यानंतर १९९७ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. विनोद यांनी 2014 पर्यंत राजकारणात योगदान दिलं होतं. अखेर २०१७ मध्ये विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला. आजारामुळे २७ एप्रिल २०१७ मध्ये विनोद खन्ना यांचं निधन झालं.