AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Television : ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’मालिका महत्त्वाच्या टप्यात, उलगडणार उन्मेष अश्वाची गोष्ट

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. (Unmesh Ashwa's story to unfold in 'Dakkhancha Raja Jyotiba')

Television : ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’मालिका महत्त्वाच्या टप्यात, उलगडणार उन्मेष अश्वाची गोष्ट
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 4:53 PM

मुंबई : सध्या इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यात सध्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. ज्योतिबाच्या अवताराची गोष्ट या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. त्यामुळे गेले अनेक दिवस या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. अशात ही मालिका आता एका महत्वाच्या वळणावर येऊन ठेपली आहे.

आता लवकरच या मालिकेत ज्योतिबाच्या उन्मेष अश्वाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार असणाऱ्या ज्योतिबाच्या कथा आपण वाचल्या आहेत. मात्र हा घोडा सफेद रंगाचाच का? ज्योतिबाला हा घोडा कुणी भेट दिला? यामागची कथा ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतून उलगडली जाणार आहे.

आता हा खास प्रसंग साकारण्यासाठी सेटवर ‘कोहिनूर’ नावाच्या घोड्याची खास एण्ट्री झाली आहे. त्यामुळे ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विशाल निकमनं या मालिकेसाठी घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं आहे. नावाप्रमाणेच हा घोडा कोहिनूर असल्याचं विशालनं सांगितलंय.

विशालनं या ‘कोहिनूर’ घोड्याचं प्रचंड कौतुक केलं आहे. ‘या खास दोस्तासोबत आता माझी मैत्री झाली आहे. माझ्याकडून घोडेस्वारी करताना थोडी जरी चूक झाली तरी कोहिनूर मला सांभाळून घेतो. मी सेटवर आल्यावर पहिली कोणाची भेट घेत असेल तर तो आहे कोहिनूर आहे. त्याला खाऊ घालणं त्याच्याशी गप्पा मारणं ही माझी सर्वात आवडती गोष्ट आहे. ज्योतिबाची भूमिका साकारण्यासाठी कोहिनूरचाही खूप मोलाचा वाटा आहे.’ असं विशालनं सांगितलंय. स्टार प्रवाहवर सुरू असलेली ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

संबंधित बातम्या 

Rashmika Mandanna | बॉलिवूडमध्ये एंट्री करताच वधारले रश्मिकाचे मानधन, ‘बिग बीं’सोबत काम करण्यासाठी आकारली ‘इतकी’ रक्कम!

आपल्या बाळाने दुसरा तैमूर होऊ नये, विराट-अनुष्काचं प्लॅनिंग ठरलं

Ranbir Kapoor | नव्या वर्षाचा नवा धमाका, रणबीर कपूर चाहत्यांना देणार मोठी गुडन्यूज!

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.