Uorfi Javed | उर्फी जावेद लग्न करण्यास तयार, मुलासाठी ठेवली ‘ही’ मोठी अट, थेट लग्नाच्या अगोदर

| Updated on: Sep 21, 2023 | 3:47 PM

उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांनी केलीये. उर्फी जावेदने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सोशल मीडियावर उर्फीची जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

Uorfi Javed | उर्फी जावेद लग्न करण्यास तयार, मुलासाठी ठेवली ही मोठी अट, थेट लग्नाच्या अगोदर
Follow us on

मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवलीये. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतात. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल हे सांगणे थोडे कठीणच आहे.

उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा केला. उर्फी जावेद हिने थेट सांगितले की, तिचे वडील कायमच तिला मारहाण करायचे. इतकेच नाही तर बऱ्याच वेळा मारहाणीमध्ये ती बेशुद्ध व्हायची. उर्फी जावेद हिने तिच्या आयुष्यामध्ये एक अत्यंत मोठा संघर्ष नक्कीच केलाय. उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे वादात सापडते.

उर्फी जावेद ही मुंबईमध्ये ज्यावेळी राहण्यासाठी आली, त्यावेळी तिच्याकडे घर नव्हते. उर्फी जावेद हिने सांगितले की, बऱ्याच वेळा रस्त्यावर झोपण्याची वेळही तिच्यावर आली. नुकताच आता उर्फी जावेद हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना उर्फी जावेद ही दिसलीये. उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून अनेकजण हैराण झाले.

उर्फी जावेद तिच्या लग्नाबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल बोलताना दिसली. उर्फी जावेद म्हणाली की, मला असा कोणीतरी पाहिजे जो तूफानी काम करणारा असावा. मला अगोदर प्रेग्नेंट व्हायचे आहे आणि मग बेबी बंप घेऊन लग्न करायचे आहे. मात्र, मला माझ्या आयुष्यामध्ये असा कोणी मिळाला नाहीये. इतरांपेक्षा वेगळा मला हवा आहे.

उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिच्या विधानाची आता जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. म्हणजेच काय तर उर्फी जावेद लग्न करण्यास तयार आहे फक्त लग्नासाठी तिच्या काही नियम आणि अटी आहेत. उर्फी जावेद ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते.

उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच एक फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये उर्फी जावेद हिने  शर्ट नव्हते घातले. या फोटोशूटमध्ये तिने फक्त हातामध्ये नाश्त्याच्या प्लेट घेतल्याचे दिसले. उर्फी जावेद हिचे हे फोटो पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. उर्फी जावेद हिच्यावर या फोटोशूटमुळे मोठी टिका देखील करण्यात आली.