‘मी गेल्यानंतर तुमच्याकडे काय उरेल…’, ‘या’ कारणामुळे Uorfi Javed पुन्हा एकदा चर्चेत
तोकड्या कपड्यांमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली Uorfi Javed आता कुठे निघाली? कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारी उर्फी जावेद पुन्हा मोठ्या कारणामुळे आली चर्चेत...
Uorfi Javed On Lock Upp – Khatron Ke Khiladi 13 : मॉडेल उर्फी जावेद (Uorfi Javed) कायम तिच्या तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फी तिच्या कपड्यांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. उर्फी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. उर्फीची फॅशन काही लोकांना अवडते. तर काही जण मात्र उर्फीच्या फॅशनच्या विरोधात असतात. पण आता उर्फी तिच्या फॅशनमुळे नाही तर, एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्फी रिऍलिटी शोमध्ये झळकणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर आता खुद्द उर्फीने पूर्णविराम दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उर्फी, कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या ‘लॉक अप सीझन 2’ आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) याच्या ‘खतरो के खिलाडी १३’ मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण उर्फीला रिऍलिटी शोमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उर्फी ‘लॉक अप सीझन 2’ आणि ‘खतरो के खिलाडी १३’ या रिऍलिटी शोमध्ये दिसणार नसल्याची माहिती समोर येत आहे. असं स्पष्टीकरण खुद्द उर्फीने केलं आहे. पापाराझींसोबत संवाद साधत असताना उर्फीने शोमध्ये झळकणार नसल्याचं सांगितलं आहे. सध्या उर्फीने मांडलेली स्पष्ट भूमिका तुफान चर्चेत आहे.
View this post on Instagram
रिऍलिटी शोबद्दल उर्फी म्हणाली, ‘मला कोणत्याही शोसाठी विचारण्यात आलेलं नाही. मी कोणताही शो करणार नाही असं लिहा…’ शिवाय विनोदी अंदाजात उर्फी पापाराझींना म्हणाली, ‘मी रिऍलिटी शोमध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे काय उरेल…’ सध्या उर्फीचं वक्तव्य तुफान चर्चेत आहे.
कायम आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असणारी उर्फी आता मोठ-मोठ्या ब्रॅन्डसोबत काम करत आहे. नुकताच उर्फीने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासोबत फोटोशूट केलं. त्यांनी डिझाईन केलेल्या साडीमध्ये उर्फी ग्लॅमरस दिसत होती. शिवाय डर्टी मॅगझीनसाठी केलेल्या लेटेस्ट फोटोशूटमुळे देखील उर्फी तुफान चर्चेत होती.
उर्फीने तिच्या करियरची सुरुवात छोट्या भूमिकांपासून केली. पण त्यामध्ये उर्फीला यश मिळालं नाही. त्यानंतर ‘बिग बॉस ओटीटी’ शोच्या माध्यमातून उर्फी प्रेक्षकांच्या भेटीस आली, पण तेव्हा देखील तिला अपयशाचा सामना करावा लागला. त्यानंतर उर्फी तिच्या कपड्यामुळे चर्चेत आली. अखेर उर्फीचे कपडे आणि तिची फॅशन चर्चेत राहिली. सोशल मीडियावर कायम उर्फीच्या फॅशनची चर्चा रंगत असते.