Uorfi Javed | चक्क चेहरा लपवताना दिसली उर्फी जावेद, कारण ऐकून चाहते हैराण, नेटकरी म्हणाले
उर्फी जावेद ही रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाही. उर्फी जावेद ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. नेटकऱ्यांच्या निशाण्यावरही उर्फी जावेद असते.
मुंबई : उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतून केली. फक्त हिच मालिका नाही तर आपल्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने केल्या आहेत. उत्तर प्रदेशमधून अभिनयासाठी उर्फी जावेद हिने मुंबई गाठली. ज्यावेळी उर्फी जावेद ही मुंबईत आली, त्यावेळी ती काही दिवस आपल्या मित्र मैत्रिणींकडे राहत होती. शेवटी उर्फी जावेद हिच्यावर अशी वेळ आली की, तिला चक्क मुंबईच्या रस्त्यावर आणि गार्डनमध्ये झोपावे लागले. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधूनच (Bigg Boss Ott) मिळालीये.
सोशल मीडियावर उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असून कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर नेहमीच तूफान व्हायरल होताना दिसतात.
मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाही. लोक जरी कपड्यांमुळे उर्फी जावेद हिच्यावर टिका करत असले तरीही सोशल मीडियावर बाॅलिवूडच्या अभिनेत्रींना देखील फॅन फाॅलोइंगमध्ये उर्फी जावेद ही मागे टाकते. काही दिवसांपूर्वीच बिकिनी लूकवरील फोटो शेअर करणे उर्फी जावेद हिला चांगलेच महागात पडले होते. लोकांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली.
View this post on Instagram
नुकताच सध्या सोशल मीडियावर उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद हिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जिमच्या कपड्यांमध्ये उर्फी जावेद ही असून उर्फीला पाहून पापाराझी तिच्याकडे जातात. यावेळी आपला चेहरा लपवताना उर्फी जावेद ही दिसत आहे. उर्फी जावेद हिला पापाराझी फोटो काढण्यासाठी पोझ मागत असताना तुम्ही जा असे म्हणताना उर्फी जावेद दिसत आहे.
यावेळी उर्फी जावेद म्हणते की, मला माहिती नव्हते की, तुम्ही इथे येणार आहात. आता फोटो नको मी मेकअप केला नाहीये. हे सर्व म्हणताना उर्फी जावेद आपला चेहरा हाताने लपवताना दिसत आहे. उर्फी जावेद हिचा आता हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करून म्हटले की, मेकअप न करताही तू खूप सुंदर दिसते. दुसऱ्याने लिहिले की, कपडे न घालता फिरताना काही वाटत नाही पण न मेकअप केल्याने हिला फोटो काढताना लाज वाटत आहे.