मुंबई : उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळे ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर दिसते. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जातात. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाहीये. उर्फी जावेद ही मुळे उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) असून काही वर्षांपूर्वी ती मुंबईत दाखल झाली. सुरूवातीला पैसे नसल्याने उर्फी जावेद हिच्यावर रस्त्यावर आणि गार्डनमध्ये झोपण्याची वेळ आली. मुंबईत (Mumbai) दाखल झाल्यानंतर मोठा संघर्ष हा उर्फी जावेद हिने केलाय. वडील देखील उर्फी जावेद हिला सतत मारहाण करत असल्याचा खुलासा तिनेच काही दिवसांपूर्वीच केला.
उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही फक्त आणि फक्त बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये. उर्फी जावेद ही बिग बाॅस ओटीटीमध्ये सहभागी झाली होती.
उर्फी जावेद ही बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर पडल्यानंतर तिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळाले. उर्फी जावेद ही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नेहमीच उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो असो किंवा व्हिडीओ हे चर्चेचा विषय ठरतात.
उर्फी जावेद ही नुकताच मुंबईमध्ये कुटुंबासोबत स्पाॅट झालीये. यावेळी उर्फी जावेद हिच्यासोबत तिची आई, बहीण आणि आजी दिसत आहे. मात्र, उर्फी जावेद हिने घातलेल्या ड्रेसची आता तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातल्याचे बघायला मिळत आहे. उर्फी जावेद हिच्यापेक्षाही अधिक तिची आई सुंदर आहे.
या व्हिडीओनंतर लोकांच्या नजरा तिच्या आईकडे गेल्या आहेत. उर्फी जावेद हिने घातलेल्या या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसवर लाल रंगाचे डाग पडल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे डाग काही ठिकाणी पडल्याचे दिसत आहेत. उर्फी जावेद हिचा हा अतरंगी ड्रेसपासून चाहत्यांनी मोठा धक्का बसलाय. उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओ कमेंट करून अनेकजण उर्फी जावेद हिला टार्गेट करताना दिसत आहेत. अनेकांनी थेट उर्फी जावेद हिची आई किती जास्त सुंदर दिसते असे देखील म्हटले आहे.