Urfi Javed | अखेर तोकड्या कपड्यांविषयी उर्फी जावेदने मान्य केली ‘ही’ गोष्ट; फॅशनबद्दल म्हणाली..
एकीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे करणी सेनेनंही तिला धमकी दिली आहे. या सर्व वादादरम्यान आता उर्फीने तिच्या फॅशनविषयी एक महत्त्वपूर्ण गोष्ट मान्य केली आहे.
मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या सेमी-न्यूड कपड्यांमुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. तोकड्या कपड्यांमुळे उर्फीला आता विविध समस्यांचाही सामना करावा लागतोय. एकीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे करणी सेनेनंही तिला धमकी दिली आहे. या सर्व वादादरम्यान आता उर्फीने तिच्या फॅशनविषयी एक महत्त्वपूर्ण गोष्ट मान्य केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
“काय योग्य आणि काय अयोग्य हे कोण ठरवतं? सेलिब्रिटी म्हणतात की मी हे सर्व प्रसिद्धीसाठी आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करतेय. होय, मी लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठीच हे सर्व करतेय. ही इंडस्ट्रीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे. त्यात चुकीचं काय आहे”, असा सवाल उर्फीने केला.
25 वर्षांच्या उर्फीने आपण काहीच चुकीचं केलं नसल्याचा पुनरुच्चार केला. तोकड्या कपड्यांविषयी लोक बोलतात, पण बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांबाबत काहीच बोललं जात नाही, अशीही तक्रार तिने केली. “या लोकांना माझ्या कपड्यांविषयी समस्या नाही. तर ते फक्त माझं नाव वापरून लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत”, असं ती म्हणाली.
View this post on Instagram
मुंबईच्या रस्त्यावर न्युडिटी पसरवण्याच्या आरोपाखाली भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या घटनेनंतर उर्फीने सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित त्यावर प्रतिक्रिया दिली आणि चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला.
“मी तुरुंगात जायला तयार आहे, पण तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर करणार का? राजकारणी किती आणि कुठून पैसा कमावतो हे आधी जगाला सांगा”, असं थेट आव्हान तिने चित्रा वाघ यांना दिलं होतं.
उर्फीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रा वाघ यांच्याबद्दल काही पोस्ट लिहिल्या आहेत. तिचे हे ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर मे होनेवाली सास है’, ‘उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी गं तू सास’ असे ट्विट्स उर्फीने केल्या आहेत.