Urfi Javed | उर्फीने थेट कॅमेरासमोरच बदलले कपडे; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात!
उर्फी जावेद तिच्या सेमी-न्यूड कपड्यांमुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. तोकड्या कपड्यांमुळे उर्फीला विविध समस्यांचाही सामना करावा लागला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
मुंबई : इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद दररोज तिच्या चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. अत्यंत अजब प्रकारचे कपडे परिधान करून ती विविध फोटोशूट करताना दिसते. अभिनयामुळे कमी तर अशा कपड्यांमुळेच ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. आजवर उर्फीने अत्यंत वेगवेगळ्या डिझाइनच्या कपड्यांमधून नेटकऱ्यांसमोर आली. मात्र यावेळी तिने कहरच केला. आता तिने चक्क कॅमेरासमोर ड्रेस बदलला आहे. उर्फीची ही कल्पना पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा डोक्याला हात लावला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
पापाराझींनी सोशल मीडियावर उर्फीचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मुंबईत उर्फी जेव्हा कारमधून बाहेर आली, तेव्हा तिने काळ्या रंगाचा टॉप आणि त्याच रंगाचे शॉर्ट्स घातले होते. त्यानंतर काही लोक तिथे जमतात आणि उर्फीला तिचा ड्रेस बदलण्यासाठी मदत करू लागतात. एका क्षणात उर्फी कॅमेरासमोरच तिचा ड्रेस बदलते. तिचा काळ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट्स अचानक फ्लोरल लाँग गाऊनमध्ये बदलतो. उर्फीची ही भन्नाट कल्पना पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले आहेत.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
उर्फी नेहमीच तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होते. यावेळीही नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडीओवर आणि फॅशन सेन्सवर टीका केली आहे. ‘मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है’, असा उपरोधिक टोला एकाने लगावला. तर ‘हे काय आहे, सस्ता वाला मेट गाला’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘हेच बाकी होतं’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
उर्फी जावेद तिच्या सेमी-न्यूड कपड्यांमुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. तोकड्या कपड्यांमुळे उर्फीला विविध समस्यांचाही सामना करावा लागला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे करणी सेनेनंही तिला धमकी दिली होती.
“काय योग्य आणि काय अयोग्य हे कोण ठरवतं? सेलिब्रिटी म्हणतात की मी हे सर्व प्रसिद्धीसाठी आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी करतेय. होय, मी लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठीच हे सर्व करतेय. ही इंडस्ट्रीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहे. त्यात चुकीचं काय आहे”, असा सवाल उर्फीने केला होता.