Urfi Javed: ‘उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्याची शक्यता’; वकिलांची महिला आयोगाकडे तक्रार

ॲड. नितीन सातपुते यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं आहे आणि ऑनलाइन तक्रारसुद्धा दाखल केली आहे. त्यांनी या प्रकरणी आयोगाला हस्तक्षेप करण्याची आणि चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलीस कारवाईची मागणी केली आहे.

Urfi Javed: 'उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्याची शक्यता'; वकिलांची महिला आयोगाकडे तक्रार
'उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्याची शक्यता'; वकिलांची महिला आयोगाकडे तक्रारImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 3:03 PM

मुंबई: भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या धमकीमुळे अभिनेत्री उर्फी जावेदचं मॉब लिंचिंग होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार वकील नितीन सातपुते यांनी राज्य महिला आयोगाकडे केली आहे. ॲड. नितीन सातपुते यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं आहे आणि ऑनलाइन तक्रारसुद्धा दाखल केली आहे. त्यांनी या प्रकरणी आयोगाला हस्तक्षेप करण्याची आणि चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलीस कारवाईची मागणी केली आहे. “उर्फी जावेद जिथे दिसेल तिथे तिचा थोबाड फोडीन”, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात न्यूडिटीवरून मोठा वाद सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी न्यूडिटी पसरवल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांनी उर्फीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याचं उत्तर देत उर्फीनेही त्यांना म्हटलं होतं, “माझा नंगा नाच असाच सुरू राहील.”

वकील नितीन सातपुते यांनी त्यांच्या तक्रारीत लिहिलं, ‘उर्फी जावेदच्या कपड्यांच्या स्टाइलवरून चित्रा वाघ यांनी लोकांना गुन्हा करण्यास प्रवृत्त केलं आहे. चित्रा वाघ यांचे समर्थक उर्फीला ट्रोल करत तिची प्रतिमा मलिन करत आहेत. इतकंच नाही तर चित्रा वाघ यांनी भररस्त्यात तिचा थोबडा फोडण्याची धमकी दिली आहे. डिसेंबर 2022 मध्ये चित्रा वाघ यांनी माध्यमांशी बोलताना थेट धमकी दिली. ज्यादिवशी उर्फी माझ्यासमोर येईल, तेव्हा मी तिचा थोबाड फोडीन, नंतर ट्विट करून सांगेन की मी काय केलं, अशी धमकी त्यांनी दिली होती.’

हे सुद्धा वाचा

‘उर्फीशी कधी आमनासामना झाला तर तिला आधी साडी देणार आणि त्यानंतरही तिचा नंगानाच सुरूच राहिला तर मी सरळ तिचा थोबडा फोडीन, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. जर उर्फीला कपड्यांची ॲलर्जी असेल तर त्या सर्वप्रकारची औषधं उपलब्ध करून देतील, असंही तिला म्हणाल्या. अशा आक्रमक भाषेमुळे उर्फीवर हिंसक हल्ले होऊ शकतात. त्यामुळे महिला आयोगाने चित्रा वाघ यांच्याविरोधात कारवाई करावी’, अशी मागणी सातपुते यांनी तक्रारीत केली.

चित्रा वाघ यांनी आज (शुक्रवार, 13 जानेवारी) पत्रकार परिषद घेत पुन्हा या वादावर वक्तव्य केलं. ‘सातपुते असो किंवा दसपुते, मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही. मी महाराष्ट्रात नंगा नाच होऊ देणार नाही’, असं त्या म्हणाल्या.

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...