चित्रा वाघ यांच्या आक्षेपांनंतर उर्फी जावेद दिग्गज व्यक्तीच्या भेटीला…

| Updated on: Jan 08, 2023 | 11:37 AM

चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर वादाच्या भोवऱ्यात अडलेल्या उर्फी जावेदने घेतली दिग्गज व्यक्तीची भेट, भेटीनंतर मॉडेल म्हणाली..

चित्रा वाघ यांच्या आक्षेपांनंतर उर्फी जावेद दिग्गज व्यक्तीच्या भेटीला...
उर्फी जावेद
Follow us on

मुंबई : मॉडेल उर्फी जावेद कायम तिच्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फीच्या सोशल मीडियावर देखील अनेक पोस्ट आहेत, ज्यामध्ये तिने विचित्र कपडे घातले आहेत. ज्यामुळे उर्फी कायम टीकेचा सामना करावा लागतो. पण काही चाहत्यांना मात्र अभिनेत्रीची स्टाईल आवडते. उर्फीचा प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत असतो. आता देखील उर्फीचा एका फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण या फोटोमुळे उर्फी वादाच्या भोवऱ्यात अडकली नसून चर्चेत आली आहे. उर्फीने नुकताच एका दिग्गज व्यक्तीची भेट घेल्यामूळे मॉडेल चर्चेत आली आहे.

उर्फी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत मॉडेल चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता देखील उर्फीने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये उर्फी गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत दिसत आहे. सध्या त्यांच्या फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

फोटो पोस्ट करत उर्फी म्हणाली, ‘अखेर माझ्या आजोबांना भेटली…’ सध्या उर्फीची पोस्ट तुफान चर्चेत होत आहे. उर्फीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. सध्या सर्वत्र उर्फी जावेद आणि जावेद अख्तर यांच्या फोटोची चर्चा रंगलेली आहे.

उर्फी जावेद वादाच्या भोवऱ्यात
विचित्र कपडे घालून कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारी उर्फी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. उर्फीच्या विचित्र कपड्यांमुळे सध्या सर्वत्र वादग्रस्त वातावरण आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर उर्फीच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फीवर निशाणा साधला होता. त्यानंतर उर्फीने देखील त्यांच्या ट्विटला सडेतोड उत्तर दिलं. चित्रा वाघ आणि उर्फीच्या वादानंतर अनेकांनी मॉडेलवर आक्षेप घेतला आहे.

उर्फीबद्दल सांगायचं झालं तर, तिने सुरूवातील मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण तिला लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देखील झळकली, पण बिग बॉसच्या घरातून देखील उर्फीच्या नशीबात निराशा आली. त्यांनंतर उर्फीच्या कपड्यांची तुफान चर्चा रंगली. अखेर उर्फीची फॅशनच तिची ओळख झाली.