Urfi Javed | “मी बेशुद्ध होईपर्यंत ते मला मारायचे”; उर्फी जावेदने सांगितला धक्कादायक प्रसंग

उर्फी तिच्या बहिणींसोबत घरातून पळाली आणि लखनऊला आली. लखनऊला ती लहान मुलांना शिकवून, क्लासेस घेऊन घराचं भाडं भरायची. त्यानंतर ती दिल्लीला गेली. दिल्लीत तिने कॉल सेंटरमध्ये नोकरी केली.

Urfi Javed | मी बेशुद्ध होईपर्यंत ते मला मारायचे; उर्फी जावेदने सांगितला धक्कादायक प्रसंग
Urfi Javed Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 1:42 PM

मुंबई : उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र फॅशनमुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं जातं. मात्र कधी कधी तिच्या प्रेमळ स्वभावामुळे नेटकरी कौतुकही करतात. उर्फी आता जरी तिच्या अजब स्टाइलमुळे प्रकाशझोतात आली असली तरी इथवर पोहोचण्यासाठी तिने बराच संघर्ष केला आहे. नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत उर्फीने तिच्यासोबत घडलेले काही किस्से सांगितले. वयाच्या 17 व्या वर्षीच ती तिच्या बहिणींसोबत मिळून घरातून पळून गेली होती. इतकंच नव्हे तर एका व्यक्तीने तिचा फोटो पॉर्न साइटवर अपलोड केला होता.

युट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्ट मुलाखतीत उर्फीने तिच्या वडिलांकडून झालेल्या मारहाणीचा उल्लेख केला. तिने सांगितलं, “माझे वडील जुन्या विचारसरणीचे आहेत आणि माझ्या आईचं फार कमी वयात लग्न झालं होतं. मला लहानपणी माझे वडील खूप मारायचे. इतर मुलींपेक्षा मी तेव्हा जास्त आत्मविश्वासू आणि थोडी वेगळी होती. कधी कधी वडील मला इतकं मारायचे की मी बेशुद्ध व्हायची. माझ्या आईचा राग ते अनेकदा माझ्यावर काढायचे. अखेर एका क्षणाला असं वाटलं की पुरे आता. यापुढे आणखी सहन होणार नाही.”

हे सुद्धा वाचा

उर्फी जेव्हा 15 वर्षांची होती तेव्हा एका व्यक्तीने तिचा फोटो पॉर्न साइटवर अपलोड केला होता. “माझ्या फेसबुक प्रोफाइलवरील तो साधाच फोटो होता. त्यामध्ये मी ट्युब टॉप घातला होता. तो फोटो एकाने पॉर्न साइटवर तसाच अपलोड केला. हळूहळू अनेकांना त्याबद्दल समजू लागलं होतं. तेव्हा सगळेजण मलाच दोष देऊ लागले होते. मी पॉर्न स्टार आहे असं ते मला हिणवू लागले. दोन वर्षांपर्यंत मी हे सगळं सहन केलं होतं”, असं ती म्हणाली.

उर्फी तिच्या बहिणींसोबत घरातून पळाली आणि लखनऊला आली. लखनऊला ती लहान मुलांना शिकवून, क्लासेस घेऊन घराचं भाडं भरायची. त्यानंतर ती दिल्लीला गेली. दिल्लीत तिने कॉल सेंटरमध्ये नोकरी केली. मात्र तिला त्यात काहीच रस नव्हता. दिल्लीहून नंतर ती मुंबईला आली आणि पेईंग गेस्ट म्हणून राहू लागली. मुंबईत काही ऑडिशन्स दिल्यानंतर उर्फीला टेलिव्हिजनवर छोट्या भूमिका मिळाल्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.