मुंबई : मॉडेल उर्फी जावेद हिच्या विचित्र कपड्यांमुळे सध्या वातावरण तापलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या ट्विटनंतर या वादाला सुरुवात झाली. वाघ यांच्या ट्विटवर उर्फी देखील रिट्विट करत त्यांना सडेतोड उत्तर देत आहे. सध्या उर्फीचे ट्विट चर्चेचा विषय बनले आहे. उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही? असं म्हणत चित्रा वाघ ऊर्फीच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचण्याचा सिलसीला सुरुच केला आहे. एका ट्विटमध्ये तर उर्फीने चित्रा वाघ यांना ‘I Love You’ म्हटलं आहे.
Lekin abhi bhi bahot Sudhar baaki hai ! Sorry @ChitraKWagh ji ! I love you pic.twitter.com/aq4i0vfuxF
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023
उर्फी ट्विट करत म्हणाली, ‘पण अद्यापही अधिक सुधारणं बाकी आहे.! सॉरी चित्रा वाघ जी! आय लव्ह यू…’ असं म्हणत उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. स्वतःचा एक फोटो पोस्ट करत उर्फीने ट्विट केलं आहे. या फोटोमध्ये उर्फीने बॅकलेस पंजाबी ड्रेस घातला आहे. उर्फीच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत.
Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023
दरम्यान, उर्फीने एका ट्विटमध्ये चित्रा यांचा सासू म्हणून देखील उल्लेख केला. ‘मेरी डीपी धांसू, चित्रा मेरी सासू’ असं म्हणत उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. कधी चित्रा वाघ जी, कधी चित्रू, तर कधी सासू, असं म्हणत मॉडेल उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना डिवचण्याचा सिलसिला चालूच ठेवलाय. उर्फीच्या ट्विटमुळे चित्रा वाघ यांचा संताप अधिक वाढत आहे.
महत्त्वाचं म्हणजे, उर्फीवरुन चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात सुरु झालेला वाद, त्या वादात सुप्रिया सुळेंनी मारलेली उडी यामुळं प्रकरण अधिकच चिघळलंय. त्यामुळे उर्फीच्या ट्विटला चित्रा वाघ कोणत्या प्रकारे उत्तर देतील, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अनेकांकडून होत असलेल्या टीकेनंतर देखील उर्फी जावेद तोकडे कपडे घालण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे उर्फीला धडा शिकवण्यावर चित्रा वाघ ठाम आहेत. त्यामुळं उर्फीचं हे प्रकरण कुठपर्यंत जाणार हेच पाहावं लागेल.