Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उर्फीचा चेतन भगत यांच्यावर पलटवार; शेअर केला ‘त्या’ लीक व्हॉट्स ॲप मेसेजचा स्क्रीनशॉट

'ते' वादग्रस्त मेसेज शेअर करत उर्फीने चेतन भगत यांना फटकारलं; करून दिली 'मी टू' मोहिमेची आठवण

उर्फीचा चेतन भगत यांच्यावर पलटवार; शेअर केला 'त्या' लीक व्हॉट्स ॲप मेसेजचा स्क्रीनशॉट
Urfi Javed and Chetan BhagatImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 11:44 AM

मुंबई: उर्फी जावेदचा अजब फॅशन सेन्स जगजाहीर आहे. कोणत्याही ट्रोलिंगला न जुमानता उर्फी चित्रविचित्र कपड्यांमध्ये फोटोशूट करताना दिसते. तिच्या याच फॅशन सेन्सवर प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी टीका केली. मोबाइल फोनचं व्यसन देशातील तरुणाईवर कशा पद्धतीने नकारात्मक परिणाम करतंय हे सांगताना त्यांनी उर्फीचं उदाहरण दिलं. उर्फीच्या फोटो आणि व्हिडीओंना इन्स्टाग्रामवर कोट्यवधी लाईक्स असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता चेतन भगत यांच्या याच टीकेवर उर्फीने उत्तर दिलं आहे. यावेळी तिने ‘मी टू’ मोहिमेदरम्यान त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा उल्लेख केला आहे.

उर्फीबद्दल काय म्हणाले चेतन भगत?

“उर्फी जावेदच्या फोटोंवर कोट्यवधी लाईक्स असतात. देशाचा एक तरुण असा आहे जो कारगिलमध्ये बसून देशाची सुरक्षा करतोय आणि दुसरीकडे काही तरूण उर्फीच्या फोटोंना लाईक करतायत”, असं ते एका कार्यक्रमात म्हणाले.

उर्फीचं चेतन भगत यांना उत्तर-

उर्फीने चेतन भगत यांच्या या वक्तव्यावर इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित उत्तर दिलं. ‘मी टू मोहिमेदरम्यान कशाप्रकारे अनेक महिलांनी त्यांच्यावर आरोप केले होते, हे विसरू नका’, असं तिने लिहिलं. यासोबतच तिने मी टू मोहिमेदरम्यान व्हायरल झालेले चेतन भगत यांचे व्हॉट्स ॲप मेसेजेसचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला.

हे सुद्धा वाचा

‘तुमच्यासारखे पुरुष हे स्वत:च्या उणीवा स्वीकारण्यापेक्षा नेहमीच दुसऱ्या महिलांना दोष देतात. तुम्ही विकृत आहात याचा अर्थ असा नाही की मुलीचा दोष आहे किंवा ती कोणते कपडे परिधान करतेय याचा दोष आहे. गरज नसतानाही माझा त्या संवादात उल्लेख केला आणि कपड्यांवर टिप्पणी केली. माझ्या कपड्यांमुळे देशातील तरुणांचं लक्ष विचलित होत असेल, तर तुम्ही मुलींना पाठवलेले मेसेज वाचून ते विचलित होणार नाहीत का’, असा सवाल उर्फीने केला.

‘रेप कल्चरचं प्रमोशन करणं थांबवा. पुरुषांच्या वागणुकीसाठी महिलांच्या कपड्यांना दोष देणं हे खूप जुनाट झालं आता. स्वत:पेक्षा अत्यंत कमी वयाच्या मुलींना तुम्ही मेसेज केले, तेव्हा हे विचार कुठे गेले? तुमच्यासारखे लोक तरुणांची दिशाभूल करतात. मुलींच्या कपड्यांना दोष देण्यासाठी तुम्ही पुरुषांना प्रोत्साहन देत आहात’, अशा शब्दांत उर्फीने चेतन भगत यांना फटकारलं.

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.