‘मी फक्त कपड्यांसाठी…’, उर्फी जावेद हिच्या वक्तव्यानंतर काय म्हणाली Kangana Ranaut ?
ट्विटरवर एकमेकींना भिडल्या उर्फी जावेद आणि कंगना रनौत; कंगनाच्या ट्विटवर उर्फीचं सडतोड उत्तर, दोघींमधील वाद कोणत्या टोकापर्यंत जाईल हे पाहणं ठरणार महत्त्वाचं
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) पुन्हा ट्विटरवर सक्रिय झाली आहे. कंगना कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही मुद्द्यावर स्वतः परखड भूमिका मांडत असते. एवढंच नाही तर, कंगनाने ‘पठाण’ सिनेमाबद्दल ट्विट केलं. आता अभिनेत्री कंगना रनौत आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यामध्ये ट्विटर वॉर पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने हिंदू अभिनेते आणि मुस्लीम अभिनेते यांच्याबद्दल ट्विट करत प्रेम फक्त खान यांना मिळतं असं म्हणाली होती. एवढंच नाही, तर हा वाद युनिफॉर्म सिव्हिल कोडपर्यंत पोहोचला. कंगनाच्या ट्विटवर आता मॉडेल उर्फी जावेद हिने उत्तर दिलं आहे.
कंगना रनौतचं ट्विट
‘माझी प्रेमळ उर्फी… असं झालं असतं तर हे एक आदर्श जग असतं. पण हे शक्य नाही’ जोपर्यंत युनिफॉर्म सिव्हिल कोड येत नाही, तोपर्यंत हा देश संविधानाने विभाजलेला दिसेल. त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे युनिफॉर्म सिव्हिल कोडची मागणी करू.. करूया ना? असा प्रश्नचिन्ह देखील कंगनाने यावेळी उपस्थित केला. कंगनाच्या या ट्विटवर आता उर्फीने उत्तर दिलं आहे.
ट्विट करत उर्फी म्हणाली, ‘ युनिफॉर्मचा विचार माझ्यासाठी योग्य नाही… कारण मी फक्त माझ्या कपड्यांमुळे प्रसिद्ध आहे…’ उर्फीचं ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, कंगना आणि उर्फी दोघींमध्ये ट्विटरवॉर सुरु असताना, आता कंगना उर्फीच्या ट्विटचं काय उत्तर देते हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कंगनाच्या ट्विटवर रिट्विट करत मॉडेल उर्फी जावेद सडेतोड उत्तर देताना दिसत आहे. ट्विटवर दोघी एकमेकींना भिडल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आता दोघींमधील वाद कोणत्या टोकापर्यंत जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सध्या सर्वत्र कंगणा आणि उर्फी यांच्यात होण्याऱ्या ट्विटची चर्चा आहे. उर्फी कायम तिच्या तोकड्या कपड्यांमुळे प्रसिद्धीझोतात राहिली. एवढंच नाही तर, तोकड्या कपड्यांमुळे उर्फीच्या अडचणी देखील वाढल्या होत्या. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावर उर्फीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.