Urfi Javed ची ‘अशी’ झाली अवस्था; अनेक वर्षांनंतर का होतोय पश्चाताप?
वयाच्या १८ व्या वर्षी उर्फी जावेद हिने केलं असं काम, ज्याचा तिला आता होतोय पश्चाताप... काही फोटो शेअर करत उर्फीने सांगितली स्वतःची अवस्था

मुंबई | 24 जुलै 2023 : मॉडेल आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) कायम तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. पण आता उर्फीने तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र उर्फी जावेद हिची चर्चा रंगत आहे. उर्फीने काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये मोठा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर, मॉडेलने इतरांना देखील सावध राहण्याचा सल्ला देत, डॉक्टरांवर निशाणा साधला आहे. उर्फी हिने ओठांची सर्जरी केली होती ज्यामुळे अभिनेत्री प्रचंड त्रास झाला आहे. उर्फी हिचे ओठ देखील सुजले आहेत. सध्या सर्वत्र उर्फी जावेद हिच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.
इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘तुम्हा सर्वांना माझ्या ओठांच्या सर्जरीबद्दल सांगत आहे. मी वयाच्या १८ व्या वर्षी ओठांची सर्जरी केली होती. तेव्हा माझ्याकडे सर्जरी करण्यासाठी पैसे नव्हते. पण मला माझे ओठ आवडत देखील नव्हते. माझे ओठ प्रचंड बारीक होते. मला मोठे ओठ हवे होते. म्हणून मी एका डॉक्टरांकडे गेली होती…’
View this post on Instagram
पुढे उर्फी म्हणाली, ‘ज्या डॉक्टरकडे मी गेली होती, त्याने कमी पैशांमध्ये माझ्या ओठांची सर्जरी केली. पण ती सर्जरी प्रचंड वेदनादायी होती आणि ते क्षण मला विसरायचे आहेत… मी तुम्हाला असं नाही सांगत की तुम्ही ओठांची सर्जरी करु नका. पण कोणत्या डॉक्टरांकडून करुन घेत आहात याची चौकशी आधी नक्की करा…’
उर्फीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. नेटकरी तिच्या पोस्टवर कमेंट देखील करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तू कायम सुंदर दिसतेस…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘तुला असं सगळं करण्याची काय गरज आहे… जे आहे त्यामध्ये आनंदी राहा…’ अनेक उर्फीच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
उर्फी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, मॉडेल कधी तिच्या तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असते, तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे उर्फी ट्रोलिंगला बळी पडते. उर्फी कायम तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. तर कधी मुंबईच्या रस्त्यांवर पापाराझींना पोज देताना दिसते.