Urfi Javed: उर्फी जावेदची नवी उचापत; ‘या’ कृतीमुळे निर्माण होऊ शकतो मोठा वाद

'जाणूनबुजून व्हिडीओ शूट'; उर्फीच्या नव्या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Urfi Javed: उर्फी जावेदची नवी उचापत; 'या' कृतीमुळे निर्माण होऊ शकतो मोठा वाद
Urfi JavedImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 2:45 PM

मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. एकीकडे ‘पठाण’ या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे मोठा वाद झाला. त्यानंतर आता उर्फीने भगव्या रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी ‘बेशर्म रंग’ या गाण्यावर कॅट वॉक करताना दिसतेय. त्यामुळे या व्हिडीओवरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होऊ शकतो.

भगव्या बिकिनीचा वाद ताजा असतानाच उर्फीने भगव्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान करत व्हिडीओ शूट केल्याने नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘हीने फक्त कॉन्ट्रोव्हर्सी करण्यासाठी भगव्या रंगाचे कपडे घातले आहेत’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘उर्फीला सतत लाइमलाइटमध्ये राहायचं असतं, म्हणून ती असं करते’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘थोडी तरी लाज बाळग’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला सुनावलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

भगव्या बिकिनीचा वाद

12 डिसेंबर रोजी पठाण या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यातील एका दृश्यात दीपिका भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली. यावरूनच मोठा वाद सुरू झाला. दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान करून, बोल्ड दृश्ये देत सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप काही हिंदू संघटनांनी केला.

हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून पठाण या चित्रपटाचा विरोध सर्वत्र होत आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. यात ‘बेशर्म रंग’ या गाण्याचाही समावेश आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.