Urfi Javed हिच्यासोबत दिसणारा ‘हा’ सेलिब्रिटी आहे तरी कोण? चाहते म्हणाले, ‘रब ने बना दी जोडी’
उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात असते. सोशल मीडियावर कायम फॅशनमुळे चर्चेत असणारी उर्फी आज 'या' सेलिब्रिटीमुळे चर्चेत... पाहा व्हिडीओ
मुंबई : मॉडेल आणि सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद काधी तिच्या तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असते, तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे उर्फी ट्रोलिंगला बळी पडते. उर्फी कायम तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. तर कधी मुंबईच्या रस्त्यांवर पापाराझींना पोज देताना दिसते. गेल्या काही दिवासांपासून अभिनेत्री अनेक कार्यक्रमांमध्ये देखील हजेरी लावत असल्याचं दिसून आलं. आता देखील उर्फी डिस्को डान्सर- द म्यूझिकल शोमध्ये दिसली. याठिकाणी देखील उर्फीला एका खास व्यक्तीसोबत स्पॉट करण्यात आलं. या खास व्यक्तीसोबत अभिनेत्रीने पापाराझींना पोझ दिल्या. सध्या सर्वत्र त्या सेलिब्रिटीसोबत असलेला उर्फीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र उर्फी जावेद हिची चर्चा रंगत आहे.
डिस्को डान्सर- द म्यूझिकल शोमध्ये देखील उर्फी तिच्या हटके फॅशनमध्ये पोहोचली. सध्या अनेकंमध्ये उर्फीच्या फॅशन सेन्सची चर्चा रंगत आहे. तिची फॅशन काही चाहत्यांना आवडली तर काहींनी मात्र उर्फीच्या कपड्यांचा विरोध केला आहे. महत्त्वाचं म्हणजे, ज्या सेलिब्रिटीमुळे उर्फी सध्या चर्चेत आली आहे, तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून ओरहान अवात्रामणी आहे.
View this post on Instagram
ओरहान आणि उर्फीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते, ‘रब ने बना दी जोडी’ म्हणताना दिसत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘दोघांची जोडी चांगली आहे. दोघे कार्टुन दिसत आहेत..’ अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘एकता कपूर हिची पुढची नागीन लॉन्च..’ सध्या सर्वत्र उर्फी आणि ओरहान यांच्या व्हिडीओची चर्चा आहे.
डिस्को डान्सर- द म्यूझिकल शोमध्ये उर्फीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. अभिनेत्रीची नवी फॅशन पाहून अनेकांनी उर्फीला ट्रोल देखील केलं आहे. डिस्को डान्सर- द म्यूझिकल शो हा बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अभिनेता सुनील शेट्टीने संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन केलं.
डिस्को डान्सर- द म्यूझिकल शोचा प्रीमियर १४ एप्रिल रोजी पार पडला. या शोमध्ये उर्फी जावेद आणि ओरहान याच्याशिवाय सनी लिओनी, मिथुन चक्रवर्ती, सुनील शेट्टी आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. ओरहान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ओरहान अभिनेत्री काजोल हिची मुलही निसा देवगण हिचा मित्र आहे.
उर्फी जावेद कायम तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात असते. करियरला सुरुवात केल्यानंतर मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारणारी उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’ मुळे चर्चेत आली. पण ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये देखील उर्फीला लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर उर्फीची फॅशनच तिची ओळख झाली. पण उर्फी आता तिच्या ओळखीमुळेच वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे.