Urfi Javed: “मी स्वत: जीव तरी देईन किंवा..”, चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फीची पोस्ट व्हायरल

पोलीस तक्रारीनंतर उर्फीची पोस्ट चर्चेत; केला आत्महत्येचा उल्लेख, म्हणाली 'राजकारण्यांविरोधात लिहिणं..'

Urfi Javed: मी स्वत: जीव तरी देईन किंवा.., चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फीची पोस्ट व्हायरल
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 8:56 AM

मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही शमण्याचं नाव घेईना. उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला. त्यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि न्युडिटी पसरवल्याबद्दल अटकेची मागणी केली. याप्रकरणी आता उर्फी जावेदची पोस्ट चर्चेत आली आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली असून त्यात आत्महत्येचा उल्लेख केला आहे.

काय आहे उर्फीची पोस्ट?

‘मला माहीत आहे की राजकारण्यांविरोधात असे पोस्ट अपलोड करणं खूप धोकादायक आहे. पण या लोकांमुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. एकतर मी स्वत:चा जीव तरी घेईन किंवा मग माझ्या मनातलं बोलेन आणि त्यांच्याद्वारे मारली जाईन. मात्र या सगळ्याची सुरुवात मी केली नाही. मी कधीच कोणासोबत काही चुकीचं केलं नाही. ही लोकं विनाकारण माझ्या मागे लागली आहेत’, असं उर्फीने लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

उर्फीने या आधीच्या पोस्टमध्ये चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्या मैत्रीचा उल्लेख केला. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना तुम्ही संजय राठोडच्या अटकेसाठी हल्लाबोल केला होता. मात्र आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोघांची मैत्री झाली. मीसुद्धा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करेन. त्यानंतर आमचीसुद्धा चांगली मैत्री होईल,’ असा उपरोधिक टोला तिने चित्रा वाघ यांना लगावला.

याआधी सोशल मीडियावर पोस्ट लिहित उर्फीने चित्रा वाघ यांना आव्हान दिलं होतं. ‘जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे. एक राजकारणी किती आणि कुठून पैसा कमावतो हे आधी जगाला सांगा. वेळोवेळी तुमच्या पार्टीतील काही पुरुष कार्यकर्त्यांवर शोषणाचे आरोप झाले आहेत. याविषयी तुम्ही कधीच काही करताना दिसल्या नाहीत’, अशी पोस्ट तिने लिहिली होती.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.