Urfi Javed I उर्फीचा नवा अवतार पाहून बाईकही कोसळली…युजर्सही झाले अवाक् !
Uorfi Javed Latest Viral Video : अतरंगी कपडे आणि स्पष्ट बोलणे, यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदचा नवा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. तिचा हा नवा अवतार पाहून फॅन्स तर अवाक् झालेच पण त्याचवेळी अशी घटना घडली की..

Uorfi Javed New Video : चर्चेत रहायची कला फिल्मस्टार्सना चांगलीच अवगत असते. उर्फी जावेद (Uorfi Javed)तर हे कोळूनच प्यायली आहे. अतरंगी, चित्रविचित्र कपडे घालणे आणि बेधडक वक्तव्य यामुळे उर्फी नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. कधी ती बबलगमचा ड्रेस घालते, तर कधी पर्सच्या सहाय्याने आऊटफिट बनवते. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. आता तिचा एकनवा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावेळीही ती तिच्या कपड्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
दरवेळी कपड्यांमुळे ट्रोल होणारी उर्फी यावेळेस अशा अवतारात समोर आली आहे ते पाहून सर्वच अवाक् झाले. फोटोग्राफर्सच्या म्हणण्यानुसार, तिचा नवा अवतार पाहून ‘जनता खुश हो गयी..’ एवढंच नव्हे तर तिचा लूक पाहून एक बाईकही कोसळली…! यातला मजेचा भाग सोडला तर बाकी सगळं खरं आहे. यावेळी मीडियासमोर आलेली उर्फी छोट्या किंवा अतरंगी कपड्यांमध्ये नव्हे तर पूर्ण कपड्यांमध्ये तेही सलवार सूटमध्ये दिसली.
सूट घातलेल्या उर्फी जावेदचा व्हिडीओ झाला व्हायरल
उर्फीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर भलताच व्हायरला झाला आहे. अनेक मीडिया पोर्टल्सनीही त्यांच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून त्याच्यावर युजर्सच्या भन्नाट कमेंट्सही आल्या आहेत. लव्हेंडर कलरच्या या सलवार सूटमध्ये उर्फी खूप सुंदर दिसत आहे. कर्ल केलेले केस मोकळे सोडून, ग्लॉसी मेकअप, मोठे झुमके आणि मॅचिंग हाय हिल्स घालून उर्फीने तिचा लूक पूर्ण केला आहे. तिचा हा नवा लूक फॅन्सना खूप आवडला असून अनेकांनी तिची स्तुती देखील केली आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीच्या नव्या लूकवर फॅन्स फिदा
उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तूफान व्हायरल झाला. त्यावर लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिची स्तुती केली, तर काही तिची मजा करत थोडं ट्रोलही केलं आहे. ‘आरती की थाली लाओ कोई..आज तो चमत्कार हो गया.’अशी मजेशीर कमेंट एकाने केली आहे. तर ‘कपडे इ्सान का गेहना है बेहना’ असंही एकाने म्हटलं आहे.
तिच्या या लूकचे फोटोग्राफर्स फोटो काढत असतानाच कोणाच्या तरी धक्क्याने मागे उभी असलेली बाईकही पडली. ती पाहून उर्फीही घाबरली, पण तिने नंतर लगेच स्वत:ला सावरलं. लोकांनी तर यावरही कमेंट केली . ‘ उर्फीचे कपडे पाहून माणूसच नाही तर बाईकही कोसळली’ अशा मजेदार अंदाजात एकाने कमेंट केली आहे. एकूणच उर्फीचा हा नवा अवतारही हिट झाला असून लोक तिची स्तुती करताना थकत नाहीयेत.
उर्फी ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. सोशल मीडियावरही ती खूप लोकप्रिय असून इन्स्टाग्रामवर लाखो लोक तिला फॉलो करतात. ती नेहमीच तिच्या अकाऊंटवर तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.