‘Bigg Boss 16’ चा विजेता एमसी स्टॅन याला शुभेच्छा देत उर्फी जावेद म्हणाली…
'Bigg Boss 16' विजेता एमसी स्टॅन याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव... उर्फीने एमसी स्टॅन याचा खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्या... पाहा एमसी स्टॅन याला काय म्हणाली उर्फी...
Urfi Jawed On MC Stan : छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस १६’ आता संपला आहे. रविवारी अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान (salman khan) याने मोठ्या उत्साहात ‘बिग बॉस १६’ चा विजेता घोषित केला आणि चाहत्यांना चक्क केलं. यंदाच्या सीझनचा विनर एमसी स्टॅन ठरला आहे. ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी जिंकल्यानंतर एमसी स्टॅन याच्या चेहऱ्यावरील आनंद फार वेगळा होता. सोशल मीडियावर सर्वत्र एमसी स्टॅन याच्या चर्चा रंगत आहे. ‘बिग बॉस १६’ शोचा विजेता एमसी स्टॅन (mc stan) झाल्यामुळे प्रत्येक रॅपरला प्रचंड आनंद झाला आहे. सध्या प्रत्येक जण एमसी स्टॅन शुभेच्छा देत त्याचं कौतुक करत आहेत. शिवाय अनेकांनी इन्स्टाग्राम स्टोरी एमसी स्टॅनचा फोटो देखील शेअर केला आहे.
मॉडेल उर्फी जावेद (Urfi jawed) हिने देखील एमसी स्टॅन याला शुभेच्या दिल्या आहेत. उर्फीने अभिनेता सलमान खान आणि एमसी स्टॅन याचा खास फोटो शअर केला आहे. फोटोमध्ये एमसी स्टॅन याच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी देखील आहे. सध्या उर्फीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो शेअर करत अभिनंदन एमसी स्टॅन” असं म्हणत उर्फीने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.
‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी शिव ठाकरे (shiv thakare) किंवा प्रियंका चौधरी (priyanka chaudhari) घरी घेवून जाईन अशी चर्चा रंगली होती. पण ‘बिग बॉस १६’ विजेता म्हणून सलमान याने एमसी स्टॅन (MC Stan) याचं नाव घोषित केलं. शोमध्ये एमसी स्टॅन हसला, निराश झाला… पण टॉप ५ पर्यंत जाण्यासाठी एमसी स्टॅन याने पूर्ण प्रयत्न केलं आणि बिग बॉस १६ ची ट्ऱॉफी आपल्या नावावर केली.
विजेता म्हणून एमसी स्टॅन याला ३१ लाख ८० हजार रुपये आणि एका कार मिळाली आहे. सध्या एमसी स्टॅन तुफान चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन याच्या चेन आणि ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधलं. सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन ८० हजार रुपयांचे बूट आणि दीड कोटी रुपयांची चेनची तुफान चर्चा रंगली.
एमसी स्टॅन याच्या महागड्या कपड्यांवर आणि लाईफ स्टाईलवर सर्वांचं लक्ष असतं. मिळालेल्या माहितीनुसार एमसी स्टॅन याची एकुण संपत्ती जवळपास १६ कोटी रुपये आहे. एमसी स्टॅन त्याच्या रॅपर कॉन्सर्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो. शिवाय एमसी स्टॅन नवीन गाणी देखील प्रदर्शित करत असतो.