Rishabh Pant सोबत लग्न करणार उर्वशी रौतेला? अभिनेत्रीचं उत्तर जाणून व्हाल हैराण

Rishabh Pant-Urvashi Rautela : ऋषभ पंत - उर्वशी रौतेला यांच्या नात्याच्या चर्चांना पुन्हा उधाण... दोघांचं होणार लग्न? अभिनेत्रीचं उत्तर जाणून व्हाल हैराण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऋषभ पंत - उर्वशी रौतेला यांच्या नात्याची चर्चा... आता अभिनेत्री असं काय म्हणाली, ज्यामुळे चाहत्यांना देखील बसला धक्का...

Rishabh Pant  सोबत लग्न करणार उर्वशी रौतेला? अभिनेत्रीचं उत्तर जाणून व्हाल हैराण
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 8:55 AM

भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत 15 महिन्यांनंतर मैदानात परतत आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएल 2024 च्या दुसऱ्या सामन्यात त्याने प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पुन्हा पदार्पण केलं आहे. डिसेंबर 2022 मध्ये पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. तब्बल 15 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पंत पुन्हा मैदानावर परतला आहे. क्रिकेटरला पाहून क्रिकेटप्रेमींना देखील प्रचंड आनंद झाला आहे. पंत मैदानात परतल्यानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यासोबत असलेल्या नात्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. या सामन्यापेक्षाही पंत चर्चेत आला आहे तो अभिनेत्री उर्वशी रौतेलाने केलेल्या एका वक्तव्यामुळे.

सांगायचं झालं तर, अनेक वर्षांपासून उर्वशी आणि पंत यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहे. पण पंत याच्या अपघातानंतर रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम लागला होता. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. अपघाता पूर्वी पंत आणि उर्वशी यांच्यात वाद झाल्याची माहिती देखील समोर आली होती. उर्वशी कायम तिच्या मुलाखतींमध्ये मिस्टर आरपीचं नाव घेत असते. एवढंच नाही तर पंतने इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून उर्वशीवर हल्ला केल्याचा आरोपही केला आहे.

नुकताच एका मुलाखतीत, उर्वशी हिला एक चाहत्याच्या कमेंटवर प्रश्न विचारण्यात आला. होस्ट चाहत्याची कमेंट वाचत म्हणाला, ‘ऋषभला तू कधीही विसरु नकोस. तो तुझा आदर करतो. पंत तुला कायम आनंदी ठेवेल… जर तुमचं लग्न झालं तर आम्हाला आनंद होईल…’ यावर उर्वशी म्हणाली, ‘नो कमेट… म्हणजे यावर मला काहीही बोलायचं नाही…’ सध्या सर्वत्र उर्वशी आणि पंत यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

ऋषभ पंत – उर्वशी रौतेला

गेल्या अनेक वर्षांपासून ऋषभ पंत – उर्वशी रौतेला यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. दोघांनी अनेकता सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांचं नाव न घेत निशाणा साधला. अनेकदा दोघांना त्यांच्या रिलेशनशिपबद्दल विचारण्यात देखील आलं. पण कधीच दोघांनी त्यांच्या नात्याची स्वीकार सर्वांसमोर केला आहे. पंतच्या अपघातानंतर देखील उर्वशीने त्याच्यासाठी आरोग्यासाठी प्रर्थना केली होती. अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट देखील चर्चेत आली होती.

उर्वशी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ‘लव्ह डोस’ गाण्यामुळे उर्वशी प्रसिद्धी झोतात आली. तिने अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. पण उर्वशीला इतर अभिनेत्रींप्रमाणे बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करता आलं नाही. सोशल मीडियावर देखील उर्वशी कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.