IND vs PAK: स्टेडियमवर उर्वशीला पाहून नेटकऱ्यांनी डिवचलं, ‘म्हणून ऋषभ पंत..’

गेल्या काही दिवसांपासून उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्यावर सोशल मीडियावर वाद सुरू आहे. योगायोगाने रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यासाठी ऋषभ पंत हा भारतीय संघात सहभागी नव्हता. त्याच्याजागी दिनेश कार्तिकला संघात स्थान दिलं गेलं.

IND vs PAK: स्टेडियमवर उर्वशीला पाहून नेटकऱ्यांनी डिवचलं, 'म्हणून ऋषभ पंत..'
Urvashi RautelaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 10:43 AM

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील वाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. मी क्रिकेट पाहत नाही असं म्हणणारी उर्वशी रविवारी दुबईत पार पडलेला भारत-पाकिस्तान सामना (Ind-Pak Match) पाहण्यासाठी स्टेडियमवर हजर होती. उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका फॅन पेजने पोस्ट केलेला फोटो शेअर केला होता. ‘भारत विरुद्ध पाकिस्तान’ असं तिने या फोटोवर लिहिलं होतं. तिचा हा फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उर्वशी आणि ऋषभ पंत यांच्यावर सोशल मीडियावर वाद सुरू आहे. योगायोगाने रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यासाठी ऋषभ पंत हा भारतीय संघात सहभागी नव्हता. त्याच्याजागी दिनेश कार्तिकला संघात स्थान दिलं गेलं. तरीसुद्धा सामना पाहण्यासाठी तो स्टेडियममध्ये हजर होता.

‘इनको क्रिकेट पसंद नही था ना (हिला क्रिकेट आवडायचा नाही ना?)’, अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘अच्छा यामुळेच ऋषभ पंत खेळत नव्हता’, असा उपरोधिक टोला दुसऱ्या नेटकऱ्याने लगावला. मॅच पाहतानाचे उर्वशीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये ती हातात तिरंगा घेऊन भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी उर्वशीने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेत चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी एका चाहत्याने तिला तिच्या आवडत्या क्रिकेटरविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना तिने लिहिलं, ‘मी क्रिकेट अजिबात पाहत नाही आणि मला कोणतेच क्रिकेटर्स माहीत नाही. पण सचिन सर आणि विराट सर यांच्यासाठी माझ्या मनात खूप आदर आहे.’

हे सुद्धा वाचा

उर्वशी-ऋषभ पंतचा वाद

ऋषभ पंत हा तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या बाल्कनीमध्ये तिची वाट पाहत होता, असं उर्वशीने थेट नाव न घेतला सूचित केलं होतं. त्यावर ऋषभनेही इन्स्टा स्टोरीमध्ये उर्वशीला उत्तर दिलं होतं. ‘लोकप्रियता मिळवण्यासाठी काही जण खोटं बोलतात’, असंच तो थेट या पोस्टमध्ये म्हणाला होता. त्यानंतर भडकलेल्या उर्वशीने लिहिलं, ‘छोटू भैय्याने बॅट-बॉलच खेळलं पाहिजे. बदनाम होण्यासाठी मी काही मुन्नी नाही. डार्लिंग तुला रक्षाबंधनच्या शुभेच्छा.’ एका मुलाखतीत उर्वशीने तिच्या दिल्लीतील शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला. या मुलाखतीत तिने असा दावा केला होता की कोणीतरी तिला भेटण्यासाठी रात्रभर वाट पाहत होतं. ती म्हणाली, “आरपी (RP) हॉटेलच्या लॉबीमध्ये आला होता आणि त्याला मला भेटायचं होतं. दहा तास झाले होते आणि मी झोपली होती. मी एकही कॉल अटेंड करू शकले नाही आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा मला 16-17 मिस्ड कॉल दिसले आणि मला खूप वाईट वाटलं की कोणीतरी माझी वाट पाहत होतं आणि मी त्यांना भेटू शकले नाही. मी त्याला म्हणाले की मुंबईला गेल्यावर भेटू. आम्ही मुंबईत भेटलो पण पापाराझींमुळे खूप मोठा ड्रामा झाला.”

2018 मध्ये उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी या दोघांना काही पार्ट्यांमध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. त्याच वर्षी नंतर या दोघांनी एकमेकांना ब्लॉक केल्याच्याही चर्चा होत्या. 2019 मध्ये ऋषभने उर्वशीला डेट करत असल्याच्या चर्चांना नकार दिला आणि इशा नेगी ही आपली गर्लफ्रेंड असल्याचं जाहीर केलं.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.