उर्वशी रौतेलाचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक; नेटकरी म्हणाले ‘पब्लिसिटीसाठी काहीही..’
अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. उर्वशी सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. तिचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलंय.
अभिनेता सनी देओलच्या ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. क्रिकेटर ऋषभ पंतसोबतचं अफेअर असो किंवा मग सोन्याचा कव्हर असलेला आयफोन हरवणं असो.. उर्वशीने नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अशातच उर्वशीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. उर्वशीचा हा बाथरुममधील प्रायव्हेट व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. ती पुन्हा एकदा पब्लिसिटी स्टंट करत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
व्हिडीओमागील सत्य काय?
उर्वशीच्या या बाथरुम व्हिडीओने सोशल मीडियावर चर्चा घडवून आणली आहे. या व्हिडीओमध्ये ती कपडे बदलताना दिसत आहे. हा व्हिडीओ केवळ पीआर स्टंट म्हणून केला असल्याच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत. त्यावरून नेटकऱ्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली आहे. ‘स्वस्तातला प्रमोशनल स्टंट’, असं एकाने लिहिलंय. तर ‘ही पब्लिसिटीसाठी काहीपण करू शकते’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘तिने गळ्यात मंगळसूत्र घातलंय, हा चित्रपटातील एखादा सीन आहे. पण पब्लिसिटीसाठी लीक केलाय’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. उर्वशीचा हा प्रायव्हेट व्हिडीओ नसून तिच्या ‘जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ (जेएनयू) या चित्रपटातील सीन लीक झाल्याचं म्हटलं जात आहे. कमेंट्समध्ये अनेकांनी असा दावा केला आहे. त्याचसोबत काहींनी असाही अंदाज वर्तवला आहे की, हा ‘ग्रेट ग्रँड मस्ती 3’ या चित्रपटातील सीन आहे.
उर्वशी नेहमीच चर्चेत
उर्वशी रौतेला अनेकदा तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. क्रिकेटर ऋषभ पंतसोबतचं तिचं अफेअर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतो. उर्वशीने तिच्या सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली तरी त्या पोस्टला ऋषभ पंतशी जोडलं जातं. उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र नंतर सोशल मीडियावर दोघांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांना टोमणे मारले. उर्वशीने एका मुलाखतीत आरपीचा (RP) उल्लेख केला होता. तो आरपी ऋषभ पंतच असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ऋषभ आणि उर्वशी यांच्यात अप्रत्यक्षपणे वाद झाला. या दोघांमधील वाद जगजाहीर आहे. उर्वशी तिच्या आलिशान लाइफस्टाइलमुळेही चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिचा 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा आयफोन हरवला होता. सोशल मीडियाद्वारे तिने चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली होती.