भावाच्या लग्नात उर्वशी रौतेलाचा कोट्यवधींचा लूक; 35 लाखांचा लेहंगा, 85 लाखांचे दागिने

लग्न भावाचं चर्चा उर्वशीचीच; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा!

भावाच्या लग्नात उर्वशी रौतेलाचा कोट्यवधींचा लूक; 35 लाखांचा लेहंगा, 85 लाखांचे दागिने
उर्वशी रौतेलाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 1:15 PM

मुंबई: अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. उर्वशीच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचंही लग्न आहे. याच लग्नासाठी ती तिच्या गावी म्हणजे उत्तराखंडला पोहोचली आहे. लग्न भावाचं असलं तरी सोशल मीडियावर चर्चा मात्र उर्वशीचीच आहे. भावाच्या लग्नातील उर्वशीचा ग्लॅमरस लूक नेटकऱ्यांना फारच आवडला आहे.

भावाच्या लग्नासाठी उर्वशी तिच्या होमटाऊनला गेली होती. उर्वशीने सकमुंडा गावातील तिच्या वडिलोपार्जित घरी जाण्याआधी सिद्धबली मंदिरालाही भेट दिली. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. लग्नात तिने मोती रंगाचा लेहंगा आणि त्यावर मॅचिंग ब्लाऊज परिधान केला आहे. त्यावर तिने भरजरी दागिने घातले आहेत.

हे सुद्धा वाचा

उर्वशीच्या या सुंदर लेहंग्याची किंमत 35 लाख रुपये तर दागिन्यांची किंमत 85 लाख रुपये असल्याचं समजतंय. लग्नसोहळ्यातील तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. हळदीच्या कार्यक्रमात उर्वशीने पिवळ्या रंगाचा फ्रॉक सूट परिधान केला होता.

उर्वशीच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ती लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये ती अभिनेता राम पोथिनेनीसोबत काम करतेय. याशिवाय ती इन्स्पेक्टर अविनाश या चित्रपटात रणदीप हुडासोबत काम करणार आहे. साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीसोबतच उर्वशी लवकरच हॉलिवूडच्याही एका प्रोजेक्टमध्ये काम कऱणार आहे.

क्रिकेटर ऋषभ पंतला डेट करण्याच्या चर्चा जेव्हा सोशल मीडियावर होऊ लागल्या, तेव्हा अभिनेत्री उर्वशी रौतेलाला बरंच ट्रोल केलं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशीने या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे. “माझ्या वक्तव्याचा लोक असा चुकीचा अर्थ काढतील याचा मला काहीच अंदाज नव्हता. आरपी हा माझा सहअभिनेता आहे आणि त्याचं नाव राम पोथिनेनी आहे. ऋषभ पंतसुद्धा आरपी म्हणून ओळखला जातो हे मला माहीतच नव्हतं”, असं उर्वशी म्हणाली होती.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.