भारत-पाक मॅचदरम्यान उर्वशीने केलं कन्फ्यूज; गळ्यात ऋषभ पंतची चेन कशी आली?

उर्वशी-ऋषभची जोडी पुन्हा चर्चेत; अभिनेत्रीच्या व्हिडीओने वेधलं लक्ष

भारत-पाक मॅचदरम्यान उर्वशीने केलं कन्फ्यूज; गळ्यात ऋषभ पंतची चेन कशी आली?
Urvashi Rautela and Rishabh PantImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 6:57 PM

मुंबई- अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांवर खुल्लम खुल्ला आरोप केले. त्यानंतर उर्वशीने ऋषभची माफीसुद्धा मागितली. या दोघांनी एकमेकांना डेट केल्याची चर्चा होती. मात्र डेटिंगच्या चर्चांमध्ये वेगळाच ट्विस्ट पहायला मिळाला. आता उर्वशीच्या एका व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. या दोघांमध्ये पुन्हा काहीतरी शिजतंय, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये होऊ लागली आहे. यामागचं कारण म्हणजे उर्वशीच्या गळ्यातील साखळी.

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका ब्रँडचं प्रमोशन करताना दिसतेय. ऑफ शोल्डर ड्रेसवर तिने गळ्यात सिल्वर आणि डायमंडची चेन घातली आहे. उर्वशीच्या गळ्यातील ही साखळी हुबेहूब ऋषभच्या गळ्यातील साखळीसारखी असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

‘वाह, आता गळ्यातसुद्धा पंतची चेन दिसू लागली आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘दोघांच्या गळ्यातील चेन तर पहा’, असं दुसऱ्या युजरने लिहिलंय. 2018 मध्ये ऋषभ आणि उर्वशीच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी रेस्टॉरंटमध्ये आणि पार्ट्यांमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. मात्र ऋषभने नंतर डेटिंगच्या चर्चा नाकारल्या होत्या.

उर्वशी-ऋषभ पंतचा वाद

ऋषभ पंत हा तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या बाल्कनीमध्ये तिची वाट पाहत होता, असं उर्वशीने थेट नाव न घेतला सूचित केलं होतं. त्यावर ऋषभनेही इन्स्टा स्टोरीमध्ये उर्वशीला उत्तर दिलं होतं. ‘लोकप्रियता मिळवण्यासाठी काही जण खोटं बोलतात’, असंच तो थेट या पोस्टमध्ये म्हणाला होता. त्यानंतर भडकलेल्या उर्वशीने लिहिलं, ‘छोटू भैय्याने बॅट-बॉलच खेळलं पाहिजे. बदनाम होण्यासाठी मी काही मुन्नी नाही. डार्लिंग तुला रक्षाबंधनच्या शुभेच्छा.’

एका मुलाखतीत उर्वशीने तिच्या दिल्लीतील शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला होता. या मुलाखतीत तिने असा दावा केला होता की कोणीतरी तिला भेटण्यासाठी रात्रभर वाट पाहत होतं. ती म्हणाली, “आरपी (RP) हॉटेलच्या लॉबीमध्ये आला होता आणि त्याला मला भेटायचं होतं. दहा तास झाले होते आणि मी झोपली होती. मी एकही कॉल अटेंड करू शकले नाही आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा मला 16-17 मिस्ड कॉल दिसले आणि मला खूप वाईट वाटलं की कोणीतरी माझी वाट पाहत होतं आणि मी त्यांना भेटू शकले नाही. मी त्याला म्हणाले की मुंबईला गेल्यावर भेटू. आम्ही मुंबईत भेटलो पण पापाराझींमुळे खूप मोठा ड्रामा झाला.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.