Urvashi Rautela | नागार्जुनच्या मुलाने उर्वशी रौतेलाला दिला त्रास? अभिनेत्रीने सांगितलं सत्य
'तू खूप चांगलं केलंस', असं एकाने लिहिलंय. तर 'मॅडम आम्ही तुमच्या पाठिशी आहोत', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. उमैर संधूने याआधीही बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल अशा प्रकारचे ट्विट्स केले आहेत. याआधी अभिनेत्री सेलिना जेटलीने त्याला फटकारलं होतं.
मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या अभिनयापेक्षा खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. उर्वशीने युएईस्थित स्वयंघोषित चित्रपट समीक्षक उमैर संधूला मानहानीची नोटीस पाठवली आहे. दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांचा मुलगा अखिल अक्किनेनीने उर्वशीला ‘एजंट’ या चित्रपटाच्या सेटवर त्रास दिल्याचं वृत्त उमैरने दिलं. आता या वृत्ताविरोधात उर्वशीने कायदेशीर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने याबाबतची माहिती दिली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
उमैर संधूने उर्वशी आणि अखिल अक्किनेनी यांच्याविषयी एक पोस्ट लिहिली होती. अखिलने एजंट या चित्रपटाच्या सेटवर उर्वशीला त्रास दिला असल्याचं त्याने लिहिलं. इतकंच नव्हे तर उर्वशीच्या मते अखिल हा बालिश कलाकार असून त्याच्यासोबत काम करताना अनेक अडचणी येत असल्याचं त्याने ट्विटरवर लिहिलं होतं. त्याच्या या ट्विटरवर उर्वशीने कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय.
‘माझ्या लीगल टीमकडून त्यांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली आहे. अशा खोट्या ट्विट्समुळे तुमच्यासारख्या पत्रकारांवर मी नाराज आहे. तुम्ही माझे अधिकृत प्रवक्ते नाहीत. पण तुम्ही नक्कीच बालिश पत्रकार आहेत ज्याने मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्रास दिला आहे’, असं तिने लिहिलंय. उर्वशीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
View this post on Instagram
‘तू खूप चांगलं केलंस’, असं एकाने लिहिलंय. तर ‘मॅडम आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. उमैर संधूने याआधीही बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल अशा प्रकारचे ट्विट्स केले आहेत. याआधी अभिनेत्री सेलिना जेटलीने त्याला फटकारलं होतं. उमैरने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं होतं, ‘सेलिना ही अशी एकमेव अभिनेत्री आहे, जिचे पिता (फिरोज खान) आणि पुत्र (फरदीन खान) यांच्याशी शारीरिक संबंध होते.’ या ट्विटवर सेलिना भडकली आणि तिने सडेतोड उत्तर दिलं होतं.
‘प्रिय संधू, अशा प्रकारची पोस्ट लिहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या पुरुष असण्यावर अधिक अभिमान वाटत असेल. तुम्हाला तुमच्या नपुंसकतेवरचा उपाय मिळाला असेल. पण तुमचा हा आजार डॉक्टरांच्या उपचारानेही बरा होऊ शकतो. कधीतरी प्रयत्न करून नक्की बघा. ट्विटरने यांच्याविरोधात त्वरित कारवाई करावी’, अशा शब्दांत सेलिनाने राग व्यक्त केला होता.