ऋषभ पंत सोबत अफेअरच्या चर्चांवर अखेर उर्वशी रौतेलाने सोडलं मौन, म्हणाली आता यानंतर तरी…
Urvashi Rautela on Rishabh pant : उर्वशी रौतेला हिने अखेर चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. तिने अफेअरच्या चर्चांवर खुलासा केला आहे.
मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचं क्रिकेटर ऋषभ पंत ( Rishabh Pant ) सोबत अफेअर सुरु असल्याच्या चर्चा आहेत. दोघांच्या नावाची सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. पण यावर आता तिने खुलासा केला आहे. बॉलीवुडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela ) गेल्या काही दिवसांपासून अफेअरमुळे चर्चेत आहे. अनेकदा ती क्रिकेटच्या मैदानावर देखील दिसते. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण येतं. क्रिकेटर ऋषभ पंतबाबत उर्वशीला अनेक जण ट्रोल देखील करतात. ( Uravshi Rautela on Rishabh Pant )
ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला (Rishabh pant and Urvashi Rautela) यांनी कधीची दोघांच्या नात्याबद्दल उघडपणे चर्चा केलेली नाही. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बोलताना तिने यावर उत्तर दिलं होतं. तिने यावेळी आरपी म्हणजे काय याचा खुलासा ही केला.
अफेअरच्या चर्चांवर अखेर खुलासा
उर्वशी रौतेला हिने म्हटलं की, RP तिच्या को -स्टारचं नाव आहे. आरपी नावावरुन तिला ट्रोल केलं जातं. पण आरपी म्हणजे माझा को स्टार राम पोथिनेनी. मला ऋषभ पंतबाबत काहीही माहित नाही. माझं आणि त्याचं नाव जोडून बरंच काही लिहिलं गेलं. पण काहीही लिहिण्याआधी विचार केला पाहिजे.सेलिब्रिटीजच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणाला ही आदर नसतो. मी यामुळे नाराज आहे.
आता तरी चर्चा बंद करा – उर्वशी
उर्वशी म्हणते की, ‘बॉलीवुड आणि क्रिकेटर्स नेहमी एकमेकांना भेटतात, या देशात कलाकारांपेक्षा क्रिकेटर्सला अधिक मान सन्मान दिला जातो. पण अशा प्रकार वाद किंवा अफवा पसरवून कोणाच्या प्रतिष्ठेला ठेस पोहोचवता कामा नये. मला आशा आहे की, यानंतर आता माझं नाव आणखी कोणासोबत जोडलं जाणार नाही. भविष्यात कोणत्याही नव्या अफवा येणार नाहीत.’
View this post on Instagram
उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela ) सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ती तिच्या सोशल मीडियावर अकाऊंवर नेहमी तिचे फोटो शेअर करत असते. उर्वशी रौतेला तिच्या सुंदर फोटोंमुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.