Urvashi Rautela ने खरेदी केलाय १९० कोटींचा भव्य बंगला? आईच्या स्पष्टीकरणानंतर व्हाल थक्क
उर्वशी रौतेला हिच्या नव्या आणि भव्य बंगल्याबद्दल मोठी माहिती समोर, खरंच अभिनेत्रीने खरेदी केलाय १९० कोटी रुपयांचा भव्य बंगला? अभिनेत्रीच्या आईने सोडलं मौन
मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत अतसे. नेहमी आपल्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहणारी उर्वशी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने १९० कोटी रुपयांचा भव्य घर खरेदी केल्याची तुफान चर्चा रंगली होती. एवढंच नाही तर, अभिनेत्री नवं घर खरेदी केल्याच्या आनंदात चाहत्यांनी उर्वशीवर आनंदाचा वर्षाव देखील केला. पण यावर उर्वशीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सध्या अभिनेत्री दुबई येथे शुटिंगमध्ये व्यस्त आहे. पण अभिनेत्रीच्या आईने यावर मोठं वक्तव्य केलं आहे. उर्वशीने १९० कोटी रुपयांचा भव्य घर खरेदी केल्याच्या चर्चांनी अभिनेत्री आई मीरा रौतेला यांनी फेक सांगितलं आहे. सध्या सर्वत्र उर्वशीच्या आईच्या स्पष्टीकरणाची चर्चा रंगत आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने यश चोप्रा यांच्या बंगल्या शेजारी घर घेतल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण या फक्त अफवा असल्याचं स्पष्टीकरण अभिनेत्रीच्या आइेने केलं आहे.. ‘असं काही झालं कर खूप चांगलं होईल, पण आता सध्या असं काही नाही…’ असं उर्वशीची आई मीरा रौतेला म्हणाल्या आहेत. सध्या सर्वत्र मीरा यांच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.
बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या साऊथ आणि इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समध्ये देखील दिसते. अभिनेत्री आज स्वतःचा वाढदिवस साजरा करत आहे. उर्वशी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. उर्वशी कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
बॉलिवूडमध्ये काम करत असताना अभिनेत्रीचं नाव क्रिकेटर ऋषभ पंत याच्यासोबत जोडण्यात आलं. दरम्यान, उर्वशी आणि ऋषभ यांच्यात कोणतही नातं नसलं, तरी फक्त सोशल मीडिया पोस्टमुळे दोघे चर्चेत असतात. उर्वशी – ऋषभ यांच्यातील चर्चा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर आल्या.
उर्वशी कायम सोशल मीडियावर अशा पोस्ट करत असते, ज्यामुळे चाहते तिची पोस्ट ऋषभ पंत याच्यासोबत कनेक्ट करतात. तर उर्वशी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
उर्वशी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. उर्वशी हिने ‘ग्रेट ग्रॅन्ड मस्ती’, ‘समन रे’, ‘सिंह साहाब द ग्रेट’, ‘काबिल’, ‘भाग जॉनी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण उर्वशीला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. पण अभिनेत्री कायम तिच्या बोल्ड आणि हॉट अदांमुळे चर्चेत असते.