ऋषभ पंतसोबतची अधुरी कहाणी उर्वशी रौतेला दाखवणार मोठ्या पडद्यावर? म्हणाली ‘जब दिल लगा तब’

आता उर्वशीने तिच्या सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली तरी त्या पोस्टला ऋषभ पंतशी जोडलं जातं. आता पुन्हा एकदा असंच काहीसं घडलं आहे. ऋषभसोबतची अधुरी कहाणी उर्वशी मोठ्या पडद्यावर आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ऋषभ पंतसोबतची अधुरी कहाणी उर्वशी रौतेला दाखवणार मोठ्या पडद्यावर? म्हणाली 'जब दिल लगा तब'
ऋषभ पंतसोबतची अधुरी कहाणी उर्वशी रौतेला दाखवणार मोठ्या पडद्यावर? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 7:47 PM

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. क्रिकेटर ऋषभ पंतसोबतचं तिचं अफेअर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता उर्वशीने तिच्या सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली तरी त्या पोस्टला ऋषभ पंतशी जोडलं जातं. आता पुन्हा एकदा असंच काहीसं घडलं आहे. ऋषभसोबतची अधुरी कहाणी उर्वशी मोठ्या पडद्यावर आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे उर्वशीची नवीन पोस्ट.

उर्वशीचं ‘तौबा मेरी तौबा’ हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणं 6 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता शरद मल्होत्रा झळकणार आहे. शरदसोबतचा फोटो पोस्ट करत उर्वशीने या गाण्याविषयी माहिती दिली. याच पोस्टवरून पुन्हा एकदा ऋषभसोबतच्या तिच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे.

हे सुद्धा वाचा

‘तौबा मेरी तौबा’ हे गाणं प्रदर्शित येण्यापूर्वीच त्याविषयीचे अंदाज वर्तवले जात आहेत. हे गाणं उर्वशी आणि ऋषभच्या अधुऱ्या लव्ह-स्टोरीवरच आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. उर्वशीच्या कॅप्शनमुळेच या चर्चांना उधाण आलं आहे. ‘किस्मत बुरी थी मेरी, ना वो शख्स बुरा था.. जिस वक्त दिल लगा, वो वक्त बुरा था’, असं लिहित उर्वशीरने ही पोस्ट शेअर केली आहे.

उर्वशी-ऋषभचा नेमका वाद काय?

उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र नंतर सोशल मीडियावर दोघांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांना टोमणे मारले. उर्वशीने एका मुलाखतीत आरपीचा (RP) उल्लेख केला होता. तो आरपी ऋषभ पंतच असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ऋषभ आणि उर्वशी यांच्यात अप्रत्यक्षपणे वाद झाला. या दोघांमधील वाद जगजाहीर आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...