Bigg Boss Grand Finale चा खास व्हिडीओ लीक? ‘या’ अभिनेत्रीला पाहून चाहते संतापले
कोण आहे 'ती' अभिनेत्री जिला पाहून संतापले चाहते...
Bigg Boss Grand Finale : रिऍलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस १६’ सध्या तुफान चर्चेत आहे. शो आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. एलिमिनेशनच्या माध्यमातून निर्माते चाहत्यांच्या आवडत्या स्पर्धकाला शॉर्टलिस्ट करत आहेत. आता लवकरच यंदाच्या सिझनचा विजेता कोण असेल कळणार आहे. याच दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री डान्स करताना दिसत आहे. पण अभिनेत्रीला पाहून चाहते भडकले आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री उर्वशी रौतेला आहे.
उर्वशीचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘बिग बॉस १६’ शोच्या Grand Finale चा असल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण अनेक फॅन पेजवर हा व्हिडीओ ‘बिग बॉस १६’ शोच्या Grand Finale चा असल्याचं सांगण्यात येत आहे. instantbollywood या इन्स्टाग्राम पेजवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘बिग बॉस १६’ शोच्या Grand Finale मध्ये उर्वशीचा परफॉर्मन्स असं लिहिलं आहे. पण यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल होत असलेल्य व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट येत आहे, ज्यामुळे व्हिडीओ खरंच बिग बॉस शोमधील आहे का? यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
कमेंट सेक्शनमध्ये युजर्सने व्यक्त केला संताप… व्हिडीओवर कमेंट करत एका युजर्न लिहिलं, ‘बिग बॉसचा फिनॅले आता नसून फेब्रुवारीमध्ये आहे.’, तर अन्य एका युजरने ‘हे कधी झालं….’ असं कमेंट करत म्हटलं आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत.
बिग बॉस १६ शोबद्दल सांगायचं झालं तर, अर्चना गौतम, प्रियंका, अब्दू रोझिक आणि निमृत दमदार स्पर्धक असल्याचं दिसून येत आहे. स्पर्धकांची घारतील वागणूक पाहून अर्चना, अब्दू आणि निमृत यांपैकी एकाच्या नशीबात ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी असू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.