Urvashi Rautela | ‘उर्वशी रौतेलाला सोडणार नाही’; ऋषभ पंतच्या चाहत्याच्या व्हिडीओवर भडकली अभिनेत्री

उर्वशीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'तू थेट ऋषभशी लग्नच कर, म्हणजे तुला चिडवणं बंद होईल', असं एकाने लिहिलं. तर 'अशी लोकं तुझ्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

Urvashi Rautela | 'उर्वशी रौतेलाला सोडणार नाही'; ऋषभ पंतच्या चाहत्याच्या व्हिडीओवर भडकली अभिनेत्री
Urvashi RautelaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 3:53 PM

मुंबई : टीम इंडियाचा क्रिकेटर ऋषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या लिंकअपच्या चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. या दोघांना जेव्हा कधी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा स्टेडियममध्ये पाहिलं जातं, तेव्हा चाहते त्यांना एकमेकांच्या नावाने चिडवतात. एकेकाळी या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. मात्र त्यात काही तथ्य नसल्याचं नंतर ऋषभने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरून दोघांनी नाव न घेता एकमेकांवर टीका केली. उर्वशी आणि ऋषभचं हे शीतयुद्ध इतकं गाजलं की चाहते आजसुद्धा त्यांना चिडवण्याची संधी सोडत नाहीत. अशाच एका व्हिडीओवर आता उर्वशीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये एक चाहता आयपीएल मॅचदरम्यान अक्षर पटेलला म्हणतो, “अक्षर भाई, ऋषभला सांग की आम्ही तुमच्यासोबत आहोत. उर्वशी रौटेलाला सोडणार नाही.” या व्हिडीओच्या अखेरीस अक्षरसुद्धा त्या चाहत्याकडे वळून बघतो. आता हा व्हिडीओ उर्वशीपर्यंत पोहोचला आहे आणि तिने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र तिची ही नाराजी ऋषभशी नाव जोडल्यामुळे नाही तर दुसऱ्याच कारणावरून आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाली उर्वशी?

उर्वशीने शनिवारी हा व्हायरल व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि लिहिलं, “माझ्या आडनावाचा चुकीचा उल्लेख करणं बंद करा. ते माझ्यासाठी फार मौल्यवान आहे. शब्दांना अर्थ असतो आणि आडनावांना शक्ती, आशीर्वाद असतो.” उर्वशीने या व्हिडीओत उच्चारलेल्या तिच्या चुकीच्या आडनावाबाबत राग व्यक्त केला आहे. मात्र उर्वशीकडून शेअर केलेल्या या व्हिडीओमधून ऋषभ पंतचं नाव काढून टाकण्यात आलं आहे.

उर्वशीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तू थेट ऋषभशी लग्नच कर, म्हणजे तुला चिडवणं बंद होईल’, असं एकाने लिहिलं. तर ‘अशी लोकं तुझ्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

क्रिकेटर ऋषभ पंत सध्या क्रिकेट मैदानापासून दूर आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून रुडकीला जाताना त्याचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. या अपघाताच्या आधी 2018 मध्ये ऋषभ आणि उर्वशीचं नाव एकत्र जोडलं गेलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.