Urvashi Rautela हिच्या समोर टळला मोठा अपघात; काळजाचा ठोका चुकवणारी घटना
उर्वशी रौतेला हिच्यासमोर धोक्यात होते 'या' मुलीचे प्राण; कार्यक्रमात घडली काळजाचा ठोका चुकवणारी घटना, नक्की झालं तरी काय?
मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. कायम सोशल मीडियावर सक्रिय असणारी उर्वशी आता मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचीच चर्चा आहे. नुकताच अभिनेत्री जयपूर याठिकाणी पोहोचली होती. अभिनेत्री एका फॅशन आणि अभिनय अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पोहोचली होती. उर्वशीला पाहिल्यानंतर अनेक चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक होते. यावेळी अनेकांनी अभिनेत्रीसोबत फोटो काढले, पण कोणत्याही प्रकारची धक्का-बुक्की कार्यक्रमादरम्यान झाली नाही. सध्या सर्वत्र उर्वशीची चर्चा आहे.
उद्घाटन सोहळ्यासाठी पोहोचलेल्या उर्वशीला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळालं. पण एक मोठा अनर्थ होता-होता टळला. आनंदाच्या क्षणी जेव्हा उर्वशी केक कट करत होती, तेव्हा मेणबत्तीच्या आगीचे ठिणगे एका मुलीच्या चेहऱ्यावर उडाले. पण त्या मुलीला तात्काळ रुग्णालायत दाखल केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
डॉक्टरांनी त्या मुलीवर उपचार केल्यानंतर सध्या उर्वशी मुलीच्या प्रकृतीची विचारपूस फोनवरुन करत आहे. सध्या सर्वत्र उर्वशी आणि त्या धक्कादायक घटनेचीच चर्चा आहे. अपघातात मुलीला काही झालं नसलं तरी काळजाचा ठोका चुकवणारी ती घटना होती… असं सांगण्यात येत आहे.
अनेक सिनेमे आणि एल्बममध्ये झळकल्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. एवढंच नाही तर, भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते. सोशल मीडियवर देखील ऋषभ आणि उर्वशी यंच्या नात्याची तुफान चर्चा रंगलेली असते.
एवढंच नाही तर, अभिनेत्रीला थेट पाकिस्तान येथून लग्नाची मागणी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाह याने उर्वशीला लग्नाची मागणी घातली आहे. आधी देखील नसीम यांचं नाव उर्वशी हिच्यासोबत जोडण्यात आलं. अशात नुकताच झालेल्या एका पत्रकार परिषदेत देखील नसीम याने उर्वशी हिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
उर्वशीने नसीम खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर दोघांच्या नात्याने जोर धरला. १५ फेब्रुवारी रोजी नसीम खान याचा वाढदिवस होता. नसीम याला २० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिनेत्री म्हणाली, ‘हॅप्पी बर्थडे नसीन शाह…’ अभिनेत्रीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर नसीमने देखील उर्वशीचे आभार मानले…
अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियीवर उर्वशीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उर्वशी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.