क्रिकेटर ऋषभ पंत सध्या क्रिकेट मैदानापासून दूर आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून रुडकीला जाताना त्याचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. या अपघाताच्या आधी 2018 मध्ये ऋषभ आणि उर्वशीचं नाव एकत्र जोडलं गेलं होतं.
Urvashi Rautela and Rishabh PantImage Credit source: Twitter
मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. क्रिकेटर ऋषभ पंतसोबतचं तिचं रिलेशनशिप बराच काळ चर्चेचा विषय ठरला होता. आता नुकत्याच एका पोस्टद्वारे उर्वशीने पुन्हा एकदा ऋषभसोबतच्या नात्याविषयी चर्चेला वाव दिला आहे. यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. ऋषभकडून पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात असतानाही उर्वशी सतत लक्ष वेधण्यासाठी अशा गोष्टी करत असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. उर्वशी आणि ऋषभ यांच्यातील वाद जगजाहीर आहे. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र ऋषभने नंतर या चर्चा फेटाळल्या होत्या.
उर्वशी एका कार्यक्रमानिमित्त कोलकाताला गेली आहे. तिथून तिने इन्स्टा स्टोरीमध्ये काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यातील पहिल्या व्हिडीओमध्ये ती लिंडा गुडमॅन लिखित ‘लव्ह साइन्स’ हे पुस्तक वाचताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये तिने पुस्तकाचं कव्हर पेज दाखवलं आहे. तर दुसऱ्या स्टोरीमध्ये तिने त्या पुस्तकातील एक पान दाखवलं आहे. या पानावर तूळ आणि मीन या दोन राशींच्या व्यक्तींमधील प्रेमाचं नातं किती अनुकूल असू शकत याविषयी लिहिलं गेलं आहे. उर्वशी ही मीन राशीची आहे. परंतु तिने विशेषकरून तूळ राशीच्या व्यक्तीसोबतचं नातं कसं असू शकेल, हे वाचायला का निवडलं याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला. कारण क्रिकेटर ऋषभ पंत हा तूळ राशीचा आहे.
उर्वशीच्या या स्टोरीवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘मला ऋषभविषयी वाईट वाटतंय. उर्वशीचं हे वागणं खूपच भीतीदायक आहे. ती त्याला स्टॉक करतेय का’ असा सवाल एकाने केला. तर ‘उर्वशीला ऋषभ आवडू शकतो हे मी मान्य करते. पण अशा गोष्टी पोस्ट करून ती स्वत:लाच मूर्ख ठरवतेय’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं. कमेंट्समध्ये अनेकांनी उर्वशीला ‘स्टॉकर’ असंही म्हटलं आहे.
क्रिकेटर ऋषभ पंत सध्या क्रिकेट मैदानापासून दूर आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून रुडकीला जाताना त्याचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. या अपघाताच्या आधी 2018 मध्ये ऋषभ आणि उर्वशीचं नाव एकत्र जोडलं गेलं होतं.