प्रसिद्ध मॉडेलचा फ्रिजमध्ये भयानक अवस्थेत आढळला मृतदेह, मृत्यूआधी तिच्यासोबत झालं तरी काय?

प्रसिद्ध मॉडेलचं हृदयद्रावक निधन; फ्रिजमध्ये अत्यंत भयानक अवस्थेत आढळला मॉडेलचा मृतदेह, ती गरोदर असल्याची माहिती देखील समोर... तिच्यासोबत नक्की झालं तरी काय? आईने केलेल्या विनंतीनंतर मॉडेलचा शोध सुरु झाला आणि धक्कादायक प्रकार समोर आला...

प्रसिद्ध मॉडेलचा फ्रिजमध्ये भयानक अवस्थेत आढळला मृतदेह, मृत्यूआधी तिच्यासोबत झालं तरी काय?
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 8:45 AM

मुंबई : 29 ऑक्टोबर 2023 : अमेरिकेतील प्रसिद्ध मॉडेलसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मॉडेलचा मृतदेह फ्रिजमध्ये अत्यंत भयानक अवस्थेत अढळला आहे. ही मॉडेल दुसरी तिसरी कोणी नसून मलीसा मूनी आहे. रिपोर्टनुसार मलीसा गरोदर होती. लॉस एंजेलिस याठिकाणी मलीसा राहत असल्याची माहिती समोर येत आहे. मृत्यूनंतर मलीसा हिचे हात – पाय घट्ट बांधून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आला होता. एवढंच नाही तर, मृत्यूपूर्वी मलीसा हिची मारहाण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणामुळे सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार मलीसा हिचा मृतदेह लॉस एंजेलिस काउंटीच्या वैद्यकीय परीक्षक विभागाकडून शवविच्छेदनासाठी देण्यात आला होता. मृत्यूआधी मॉडेल हिच्यासोबत हिंसा झाल्याचं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. शवविच्छेदन रिपोर्टनुसार, मॉडेलच्या शरीरावर जड वस्तूने हल्ला करण्यात आला होता. तिच्या शरीरात अल्कोहोल आणि कोकेनचे अंशही सापडले होते.

12 सप्टेंबर रोजी 31 वर्षीय मॉडेल मलीसा मूनी हिचा मृतदेह तिच्या डाउनटाउन लॉस एंजेलिस अपार्टमेंटमधील रेफ्रिजरेटरमध्ये सापडला होता. मलिसा 6 सप्टेंबर रोजी तिच्या अपार्टमेंटमध्ये शेवटची दिसली होती. पण 6 सप्टेंबरनंतर मलीसा दिसलीनसल्यामुळे तिच्या आईच्या विनंतीवरुन पोलिसांनी मॉडेलच्या अपार्टमेंटची तपासणी केली आणि फ्रिजमध्ये मलीसा हिचा मृतदेह आढळला.

हे सुद्धा वाचा

मलीसा हिच्या मृत्यूनंतर आणखी एक समोर आलेली धक्कादायक गोष्ट म्हणजे मलीसा हिच्या ‘आयक्लाऊड’वर एक अलर्ट मेसेज देखील सापडला आहे. ज्यामुळे तिचा मोबाईल अन्य कोणी वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण मॉडेलच्या मृत्यू प्रकरणी अद्याप कोणाला अटक झाली नसल्याची माहिती मिळत आहे. संबंधीत प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलीस तपासात पुढे काय उघड होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मलीसा हिच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या बहिणीने देखील शोक व्यक्त केला आहे. माझ्या बहिणीला काय त्रास सहन कराला लागला असेल, याची मी कल्पना करू शकत नाही. असं तिची बहीण म्हणाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहते श्रद्धांजली देत आहेत.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.