Video | डिलीवरीनंतर जिममध्ये व्यायाम करताना पायल मलिक हिला पाहून लोक हैराण, थेट दिला ‘हा’ मोठा सल्ला

| Updated on: Jun 04, 2023 | 5:00 PM

यूट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी या कायमच चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अरमान मलिक हा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. अरमान मलिक आणि त्याच्या पत्नींची तगडी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

Video | डिलीवरीनंतर जिममध्ये व्यायाम करताना पायल मलिक हिला पाहून लोक हैराण, थेट दिला हा मोठा सल्ला
Follow us on

मुंबई : यूट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) नेहमीच चर्चेत असलेले एक नाव आहे. अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नीची सोशल मीडियावर मोठी तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अरमान मलिक आणि त्याच्या कुटुंबियांवर चाहत्यांच्या नेहमीच बारीक नजरा असतात. काही दिवसांपूर्वीच अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल मलिक (Payal MaliK) हिने जुळ्या बाळांना जन्म दिलाय. इतके नाही तर अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक हिने देखील एका मुलाला जन्म दिलाय. सतत आपल्या पर्सनल लाईफमध्ये काय घडते, याची माहिती मालिक फॅमिली (Family) आपल्या चाहत्यांना देताना दिसते. पायल मलिक ही तीन लेकऱ्यांची आई असून आपल्या फिटनेसकडे खास लक्ष देते.

नुकताच पायल मलिक आणि अरमान मलिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरत तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अरमान मलिक याच्यासोबत पायल मलिक ही जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. विशेष म्हणजे पायल मलिक हिच्या डिलीवरीला काही दिवस झालेले असताना पायल हिला व्यायाम करताना पाहून अनेकांना धक्का बसलाय.

पायल मलिक हिची डिलीवरी होऊन अजून दोन महिने देखील झाले नसताना जिममध्ये व्यायाम करताना पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत थेट इतक्या लवकरच व्यायाम न करण्याचा सल्ला हा पायल मलिक हिला दिला आहे. डिलीवरीनंतर पायल मलिक हिचे वजन खूप जास्त वाढले आहे.

पायल मलिक हिला पूर्वीप्रमाणे फिगर हवे असल्याने पायल मलिक हिने व्यायामाला सुरूवात केलीये. इतकेच नाही तर अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही देखील ब्लाॅगमध्ये व्यायाम करताना दिसत आहे. मात्र, यांचे चाहते यांना व्यायाम न करण्याचा सल्ला सातत्याने देताना दिसत आहेत. व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत.

अरमान मलिक, पायल मलिक आणि कृतिका मलिक हे गेल्या काही वर्षांपासून ब्लाॅगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मलिक फॅमिली मोठी कमाई करते. यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच तूफान व्हायरल होताना दिसतात. आता पायल मलिक हिचा हा व्यायाम करतानाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.