Bhetli Ti Punha 2 : वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ही सुंदर जोडी पुन्हा येणार भेटीला, ‘भेटली ती पुन्हा 2’ ची घोषणा

'भेटली तू पुन्हा' हा चित्रपट 28 जुलै 2017 ला प्रदर्शित होता. आज या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाल्याचं औचित्य साधून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. (Vaibhav Tatvavadi and Pooja Sawant, the beautiful couple to meet again, announcement of 'Bhetli Ti Punha 2')

Bhetli Ti Punha 2 : वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ही सुंदर जोडी पुन्हा येणार भेटीला, भेटली ती पुन्हा 2 ची घोषणा
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 3:32 PM

मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानं आता चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. तर ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाचा ‘भेटली ती पुन्हा 2’ हा सिक्वेल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) आणि पूजा सावंत (Pooja Sawant) ही सुंदर जोडी पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे.

‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट 28 जुलै 2017 ला प्रदर्शित होता. आज या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाल्याचं औचित्य साधून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे आता अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.

‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाला मिळाला होता उत्तम प्रतिसाद

अतिशय हलकीफुलकी कथा, वैभव तत्ववादी, पूजा सावंत यांचा सुंदर अभिनय, उत्तम दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू, ‘हरवू जरा….’, ‘जानू जानू….’ अशी उत्तमोत्तम गाणी यांचा मिलाफ ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटात झाला होता. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही लाभला होता. आता सिक्वेलची घोषणा झाल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या कथेनं काय नवं वळण घेतलं आहे, यात अजून काय नवीन बघायला मिळणार आहे किंवा कोणती गाणी असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

देवी सातेरी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप स्टुडिओज या चित्रपटाची निर्मिती करणार असून गिरीश परब, आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर ‘भेटली ती पुन्हा 2’ या सिक्वेलद्वारे आजवर अनेक मालिकांचं दिग्दर्शन केलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक जयंत पवार हे सिनेदिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहेत. ‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट लिहिणारे संजय जमखंडी ‘भेटली ती पुन्हा 2’ चं लेखन करत आहेत. (Vaibhav Tatvavadi and Pooja Sawant, the beautiful couple to meet again, announcement of ‘Bhetli Ti Punha 2’)

‘भेटली तू पुन्हा’ चित्रपटाला 4 वर्षे पूर्ण वैभव तत्ववादीनं शेअर केला खास व्हिडीओ

‘भेटली तू पुन्हा’ चित्रपटाला 4 वर्षे पूर्ण झाल्यानं वैभव तत्ववादीनं एक सुंदर रिल व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या

Mandira Bedi : मंदिरा बेदीनं साजरा केला लेकीचा 5वा वाढदिवस, तारा आणि राजसोबत फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

Net Worth : ‘गँग्स ऑफ वासेपुर’मधून हुमा कुरेशीची बॉलिवूडमध्ये एण्ट्री, एका चित्रपटासाठी घेते एवढी रक्कम