मुंबई : मिशिगनच्या 25 वर्षीय वैदेही डोंगरे (Vaidehi Dongre) हीने ‘मिस इंडिया यूएसए 2021’चे (Miss India USA 2021) विजेतेपद पटकावले आहे. वैदेही यांनी मिशिगनमधून पदवी प्राप्त केली आहे. ती एका मोठ्या कंपनीत बिजिनेस डेव्हलपर म्हणून काम करते. वैदेहीने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे, तर जॉर्जियाच्या अर्शी लालानीने स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला दिला.
या स्पर्धेदरम्यान वैदेही म्हणाली की, मला माझ्या समाजावर सकारात्मक प्रभाव पडायचा आहे आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासह महिलांच्या साक्षरतेवरही काम करायचे आहे.
वैदेही उत्तम नर्तकी देखील आहे. ती खूप चांगले कथक करते. उत्कृष्ट कथक सादरीकरणाबद्दल तिला ‘मिस टॅलेन्टेड’ ही पदवी देखील मिळाली आहे. अर्शीबद्दल बोलायचे तर, तिने तिच्या अभिनयाने आणि आत्मविश्वासाने सर्वांना आश्चर्यचकित केले. ज्यामुळे ती दुसऱ्या क्रमांकाची विजेती ठरली. तिने ब्रेन ट्यूमर सारख्या जीवघेण्या आजाराशी संघर्ष केला आहे. सेकंड रनर अपबद्दल बोलायचे तर, उत्तर कॅरोलिनाच्या मीरा कसारी हिने हे विजेतेपद जिंकले आहे.
या तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 3 राज्यांतील 61 स्पर्धकांनी भाग घेतला होता. ‘मिस इंडिया यूएसए’, ‘मिसेस इंडिया यूएसए’ आणि ‘मिस टीन इंडिया यूएसए’ अशी तीन स्पर्धा होती. या तिघांच्या विजेत्यांना जागतिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी तिकिटे देण्यात आली होती.
सुमारे 40 वर्षांपूर्वी, सुप्रसिद्ध भारतीय-अमेरिकन धर्मात्मा सरन आणि नीलम सारण यांच्या वर्ल्डवाईड पिजेंट अंतर्गत न्यूयॉर्कमध्ये या स्पर्धेची सुरूवात झाली होती. ‘मिस इंडिया यूएसए’ ही भारताबाहेर प्रदीर्घकाळ चालणारी भारतीय स्पर्धा आहे.
(Vaidehi Dongre wins Miss India USA 2021 beauty competition)
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणतेय, ‘त्याच्यापासून लांब राहाणं आणि न बोलणंच माझ्यासाठी उत्तम!’
Photo : टीव्हीची हॉट ‘नागिन’ अभिनेत्री सुरभी चंदनाचा ग्लॅमरस अवतार, पाहा बोल्ड फोटो
Raj Kundra | राज कुंद्राच्या वेब सीरीजसाठी नग्न ऑडिशनची मागणी, अभिनेत्रीचा आरोप https://t.co/BQjWcmY7VA #RajKundra | #RajKundraArrest | #ShilpaShetty | #MumbaiPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2021