ट्विंकल खन्ना नाही तर, ‘या’ अभिनेत्रीमुळे रेखा – अक्षय कुमार यांची ‘अधुरी प्रेम कहाणी’
ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्न करण्याआधी अनेक अभिनेत्रींना डेट केलय 'खिलाडी कुमार'ने, कोणामुळे अधुरी राहिली रेखा - अक्षय कुमार यांची लव्हस्टोरी?
Rekha – Akshay Kumar : ९० च्या दशकातील अनेक सेलिब्रिटी आज त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा हेच सेलिब्रिटी त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होते. अनेक अभिनेत्रीचं नाव बॉलिवूडच्या अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. पण काही सेलिब्रिटींचं नातं लग्नापर्यंत पोहचलं, तर काहींचं मात्र ब्रेकअप झालं. खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिल्या त्या म्हणजे अभिनेत्री रेखा (Rekha).. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांच्या नावाची तुफान चर्चा रंगली. पण एक काळ असाही होता, जेव्हा रेखा यांचं नाव अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्यासोबत देखील जोडण्यात आलं.
९० च्या दशकातील सर्वात बिनधास्त अभिनेता म्हणजे खिलाडी कुमार. अनेक सिनेमांमध्ये ऍक्शन सीन देत अक्षय कुमार याने चाहत्यांच्या मनात घर केलं. अभिनयामुळे कायम चर्चेत असलेला अक्षय कुमार त्याच्या रिलेशनशिपमुळे कायम चर्चेत राहिला. जेव्हा अक्षय कुमार आणि अभिनेत्री रवीना टंडन यांच्या नात्याची चर्चा सुरु होती तेव्हा १३ वर्ष लहान अक्षय याच्याबद्दल रेखा यांच्या मनात प्रेमाचा गुलाब बहरल्याचं अनेकदा समोर आलं.
रवीना आणि अक्षय १९९६ मध्ये रिलेशनशिपमध्ये होते. दोघे ‘खिलाडियो के खिलाडी’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होते. सिनेमात रवीना आणि अक्षय यांच्यासोबत रेखा देखील मुख्य भूमिकेत होत्या. सिनेमात अक्षय आणि रेखा यांचे इंटिमेट सीन देखील होते. याचदरम्यान रेखा आणि अक्षय एकमेकांच्या जवळ आले. (Rekha – Akshay Kumar love story)
सिनेमाच्या शुटिंगदरम्यान दोघे एकमेकांसोबत वेळ देखील व्यतीत करायचे. अशात दोघांमध्ये तयार होत असलेलं नातं रवीना हिला मान्य नव्हतं. एवढंच नाही तर, रेखा, अक्षयसाठी जेवणाचा डब्बा देखील आणायच्या. अक्षय आणि रेखा यांच्या नात्याला रवीनाचा विरोध होता. कारण रवीना – अक्षय तेव्हा एकमेकांना डेट करत होते. (Rekha – Akshay Kumar)
रवीना (raveena tandon) हिचा अक्षय याच्यासोबत असलेल्या नात्याला विरोध पाहता खिलाडी कुमार आणि रेखा यांची प्रेम कहाणी अधुरी राहिली. पण या घटनेनंतर अक्षय आणि रावीना यांच्यात असलेल्या नात्याने देखील वेगळं वळण घेतलं. अखेर अक्षय – रवीना देखील विभक्त झाले. पण रेखा, अक्षय, रवीना यांच्यातील नातं आजही चर्चेत आहे.
आता रवीना आणि अक्षय त्यांच्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत आहेत. पण रेखा मात्र सर्वकाही असूनही एकट्या राहतात. रेखा यांच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाने एन्ट्री केली. पण रेखा यांच्या आयुष्यात प्रेम कायम राहिलंच नाही. (raveena tandon lifestyle)