ऐश्वर्या राय हिच्या लेकीला बघताच लोकांना पडला मोठा प्रश्न, थेट म्हणाले, ही कधीतरी…
ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऐश्वर्याच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. सतत घटस्फोटाच्या चर्चा या सुरू आहेत. मात्र, यावर भाष्य करणे टाळताना ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबिय दिसत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही मोठ्या संपत्तीची मालकीन असून बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सांगितले जाते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सातत्याने सांगितले जाते. कायमच ऐश्वर्या राय ही विदेशात आपल्या मुलीसोबत जाताना दिसते. हेच नाही तर अनंत अंबानी याच्या लग्नामध्येही ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली होती. दुसरीकडे बच्चन कुटुंबिय एकत्र दाखल आले होते.
ऐश्वर्या राय ही नुकताच पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये पोहोचली होती. यावेळी जबरदस्त लूकमध्ये ऐश्वर्या दिसली. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिच्या लूकची जोरदार चर्चा रंगताना दिसली. नेहमीप्रमाणे आराध्या बच्चन देखील आई ऐश्वर्या राय हिच्यासोबत थेट पॅरिस फॅशन वीकमध्ये पोहोचली होती. यावेळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
आता नुकताच पॅरिस फॅशन वीकमधून ऐश्वर्या राय ही भारतात परतलीये. यावेळी ऐश्वर्या हिच्यासोबत आराध्या बच्चन देखील दिसली. जबरदस्त लूकमध्ये मायलेकी दिसत होत्या. आता यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. लोक या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
एकाने या फोटोवर कमेंट करत म्हटले की, नेहमीच आईसोबत दुबई तर कधी अमेरिका आराध्या जाते…आता ही विदेशातून आलीये…ही आराध्या शाळेत नेमकी कधी जाते? दुसऱ्याने लिहिले की, आई-वडील, आजोबा आणि आजीप्रमाणे हिला देखील बॉलिवूडमध्येच करिअर करायचे आहे वाटत….यामुळेच ही शाळेत अजिबातच जात नाही.
ऐश्वर्या राय हिच्यासोबत कायमच विदेशात जाताना येताना आराध्या बच्चन ही दिसत असल्याने आराध्या शाळेत कधी जाते की नाही हा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र, काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत आराध्या बच्चन हिने दिली होती. यामध्ये तिने सांगितले होते की, आराध्या दररोज शाळेत जाते. तिच्या शाळेचे नियोजन करूनच मी विदेशात जाण्याचे सर्व प्लॅन व्यवस्थित तयार करते.