वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी पुन्हा भिडल्या, रितेशने तुझा माज उतरवला तरी सुद्धा….
Bigg boss marathi : बिग बॉस मराठी चांगलेच धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनची क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळतंय. घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांच्यामध्ये जोरदार वाद होताना दिसत आहेत.
बिग बॉस मराठी चांगलेच धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनला रितेश देशमुख हा होस्ट करतोय. रितेश देशमुख याचा हा अंदाज चाहत्यांना आवडताना दिसतोय. बिग बॉसच्या घरात मोठे वाद आणि भांडणे होताना दिसत आहेत. थेट रितेशसमोरही घरातील सदस्य भांडताना दिसत आहेत. हे सीजन चांगलेच चर्चेत आहे. रितेश देशमुख हा निकी तांबोळी हिचा क्लास लावताना दिसला. हेच नाही तर त्याने निकी तांबोळी हिला माफी मागण्यासही सांगितले. यापूर्वी निकी तांबोळी ही बिग बॉस हिंदीमध्ये धमाका करताना दिसली. बिग बॉस हिंदीनंतर ती आता मराठीमध्ये दाखल झालीये.
बिग बॉस मराठीमध्ये जोरदार भांडणे करताना निकी तांबोळी ही दिसत आहे. नुकताच आता निकी तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये जोरदार भांडणे बघायला मिळाली. कचऱ्यावरून आणि स्वच्छतेवरून यावेळी दोघींमध्ये वाद झाला. हेच नाही तर दोघींचा वाद चांगलाच टोकाला गेल्याचे बघायला मिळाले.
वर्षा उसगांवकरने निकी तांबोळी हिच्या बेडवरील साहित्य फेकले. दुसरीकडे वर्षा उसगांवकरचे साहित्य देखील निकी तांबोळी हिने फेकले. हेच नाही तर दोघीही एकमेकांवर जोरात ओरडताना दिसल्या. यावेळी निकी तांबोळी आक्रमक झाल्याचे सांगताना वर्षा उसगांवकर दिसल्या.
वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांचे भांडणे सुरू असताना घरातील इतर सदस्य बघ्याच्या भूमिकेत दिसले. भांडणामध्ये निकी तांबोळी हिला वर्षा उसगांवकर या थेट म्हणाल्या की, रितेश देशमुख याने तुझा माज उतरवला. यावेळी परत परत वर्षा उसगांवकर यांनी म्हटले की, रितेशने तुझा इतका जास्त माज उतरवला तरीही तू अजून सुधारली नाहीस.
हेच नाही तर बिग बॉसच्या घरात निकी तांबोळी आणि अरबाज यांच्यात देखील वाद होताना दिसला. तू मला येऊन सॉरी पण म्हणली नाही, हे म्हणताना अरबाज हा दिसला. यावेळी निकी तांबोळी ही अरबाज याला काही गोष्टी समजून सांगताना दिसली. आता याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.