वर्षा उसगांवकर यांना कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीने मिळाले होते महाभारतात काम

बिग बॉस मराठीच्या सीजन ५ मध्ये मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर या देखील स्पर्धक म्हणून आल्या आहेत. त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. वर्षा उसगांवकर यांनी महाभारतात देखील काम केले आहे. त्यांनी या मालिकेत काम कसे मिळाले होते याचा खुलासा त्यांनीच केला आहे.

वर्षा उसगांवकर यांना कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीने मिळाले होते महाभारतात काम
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 4:34 PM

Varsha Usgaonkar : 80 च्या दशकात ग्लॅमर मिळणं खूप कठीण होतं. अनेकांना संघर्ष करुनही तो मिळाला नाही तर काहींच्या नशिबात तो समोरुन चालत आला. बॉलीवूड आणि टीव्ही जगतातील शोमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यात खूप कमी लोकांना यश मिळालंय. आज मनोरंजनाचे साधन खूप सोपे झाले आहे. प्रवास करत असताना देखील लोकं आता मनोरंजन करताना दिसतात आणि ते व्हिडिओ YouTube आणि सोशल मीडियावर अपलोड करुन प्रसिद्धी मिळवतात. आता OTT मुळे तर या क्षेत्रात येणं सोपं झालं असलं तरी 80 च्या दशकात फक्त दूरदर्शन असायचं आणि त्यावरील एखाद्या शोमध्ये काम करण्याची संधी मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. या दरम्यान ‘हम लोग’, ‘बुनियाद’, ‘नुक्कड’, ‘सर्कस’ हे दूरदर्शनचे प्रमुख शो असायचे. या टीव्ही सीरियल्समध्ये सर्वाधिक गाजली होती की बीआर चोप्रा यांची ‘महाभारत’नेही खूप लोकप्रियता मिळवली. हा शो एवढा प्रसिद्ध झाला की आजही लोक त्याबद्दल चर्चा करतात.

बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेत अनेक कथा दाखवण्यात आल्या होत्या. प्रत्येक पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याचं सिलेक्शन कसे झाले याची एक वेगळी बातमी होऊ शकते. कारण यासाठी खूपच काळजी घेतली गेली होती. या महाभारतात उत्तराची भूमिकाही प्रसिद्ध झाली होती. ही व्यक्तिरेखा मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी साकारली होती. वर्षा उसगांवकर यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ग्लॅमर जगतातील एक लोकप्रिय चेहरा आहे. लेहरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी महाभारतात त्यांचे सिलेक्शन कसे झाले याबाबत खुलासा केला होता.

वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, उत्तराची भूमिका त्यांना योगायोगाने मिळाली होती. त्या शूटिंग पाहण्यासाठी सेटवर गेल्या होत्या. तेव्हा अभिमन्यूसोबत एक सीक्वेन्स शूट केला जात होता आणि त्याच्या पत्नीची भूमिका कोणीतरी साकारण्यासाठी शोध सुरू होता. यासाठी मुलीला शास्त्रीय नृत्य कळले पाहिजे एवढीच अट होती.

वर्षा उसगांवकर यांनी सांगितले की, जेव्हा त्या सेटवर पोहोचल्या तेव्हा प्रॉडक्शन डिझायनर गुफी पेंटल तिथे होते. त्यांनी उत्तराची भूमिका करणार का असे विचारले. जेव्हा अभिनेत्रीच्या पालकांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी लगेचच आपली मुलगी ही भूमिका करणार असल्याचे मान्य केले. वर्षा यांनी सांगितले की, वर्षा महाभारत शोचा भाग होणार याचा तिच्यापेक्षा तिच्या पालकांना जास्त आनंद झाला होता. तिच्यासोबतचा प्लस पॉइंट म्हणजे ती शास्त्रीय नृत्य शिकली होती.

ऑडिशन दिले नाही

लेहरेनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असेही सांगितले की, कोणत्याही स्क्रीन टेस्टशिवाय त्यांना उत्तराच्या भूमिकेसाठी फायनल करण्यात आले होते. सर्व काही फायनल झाले आणि ती बीआर चोप्राची ‘उत्तरा’ बनली. बीआर चोप्रा यांच्या महाभारताची क्रेझ लोकांमध्ये खूप आहे. हा कार्यक्रम आजही दूरदर्शनवर प्रसारित केला जातो. महाभारत ही मालिका दूरदर्शनवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ५ वाजता पाहता येईल.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.