Varsha Usgaonkar: वडिलांचं अंत्यसंस्कारही वर्षा यांच्या नशिबात नव्हतं, कारण…
Varsha Usgaonkar: 'शेवटचा निरोप घेऊ शकले नाही, पण पापा...', वडिलांचं अंत्यसंस्कारही वर्षा उसगांवकर यांच्या नशिबात नव्हतं, व्हिडीओ पाहून येईल तुमच्याही डोळ्यात पाणी..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वर्षा उसगांवकर यांची चर्चा...
Varsha Usgaonkar: मराठी सिनेविश्वातील प्रिसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या काही दिवसांपासून वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस मराठी’ शोच्या पाचव्या भागामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’ शोमुळे वर्षा यांचं खासगी आयुष्य देखील प्रेक्षकांसमोर येऊ लागलं आहे. शोमध्ये नुकताच झालेल्या एका टास्कमध्ये स्पर्धकांनी आयुष्यातून कायम निघून गेलेल्या व्यक्तींबद्दल भावना व्यक्त करण्यास सांगिल्या.
‘बिग बॉस’ने टास्क दिल्यानंतर वर्षा उसगांवकर यांनी मोठा खुलासा केला. वर्षा उसगांवकर यांनी दिवंगत वडिलांबद्दल मत व्यक्त केलं. बिग बॉसने सांगितल्याप्रमाणे आयुष्यातून निघून गेलेल्या व्यक्तींना फोन लावून बोलण्याचा टास्क होता. अशात वर्षा यांनी वडिलांनी फोन केलं. अभिनेच्या वडिलांचं निधन 2020 मध्ये झालं आहे.
View this post on Instagram
वर्षा उसगांवकर यांच्या वडिलांच निधन 16 जून 2020 मध्ये झालं होतं. पण तेव्हा प्रसंग आसा होता की, त्यांना वडिलांच्या अंत्यदर्शनही घेता आलं नाही. फोनवर रडत वर्षा उसगांवकर म्हणाल्या, ‘आज मला तुझी आठवण येतेय पप्पा… तू खुप मोठा माणूस होतास. कोरोनाचं संकट जगावर असल्यामुळे वडिलांचं अंत्यदर्शन देखील घेता आलं नाही.
व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अखेरचं वडिलांना पाहाता आलं… वडिलांच्या शिस्तीमुळे त्यांची प्रचंड भीती वाटायची… त्याच भीतीमुळे वडिलांवर किती प्रेम आहे… हे सांगणं राहून गेलं. वर्षा म्हणाल्या, ‘मला तुझा खूप अभिमान आहे. तू खूप चांगला नेता होतास. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.’
पुढे फोन ठेवताना वर्षा म्हणाल्या, माझे वडील कायम माझ्या पाठिशी आहेत… असंच मला वाटत असतं. असं देखील वर्षा उसगांवकर म्हणाल्या. वडिलांबद्दल भावना व्यक्त करत असताना वर्षा भावूक झाल्या. सध्या बिग बॉसमुळे वर्षा तुफान चर्चेत आहेत.