Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varun Dhawan | वरुण धवनमुळे मोठा ‘बवाल’; फोटोशूटदरम्यान जान्हवी कपूरसोबत केलं नको ते कृत्य

याच फोटोवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'वरुण नेहमीच त्याच्या अशा वागणुकीमुळे चर्चेत असतो, त्याने आता सुधारलं पाहिजे', असं एकाने लिहिलं आहे. तर 'वरुण नेहमीच त्याच्या सह अभिनेत्रींसोबत असं काही करतो, ज्यामुळे तो ट्रोल होतो', असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

Varun Dhawan | वरुण धवनमुळे मोठा 'बवाल'; फोटोशूटदरम्यान जान्हवी कपूरसोबत केलं नको ते कृत्य
Varun Dhawan, Janhvi KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 3:02 PM

मुंबई | 19 जुलै 2023 : अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या भूमिका असलेला ‘बवाल’ हा चित्रपट येत्या 21 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. सध्या वरुण आणि जान्हवी या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीलाही चाहत्यांची पसंती मिळतेय. मात्र वरुण आणि जान्हवीच्या एका प्रमोशनल फोटोशूटचे फोटो सोशळ मीडियावर सध्या चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये वरुण जान्हवीचं कान चावताना दिसतोय. त्यावरून नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलंय.

वरुण धवन आणि जान्हवी कपूर हे चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त खास फोटोशूट करत होते. यातील एका फोटोमध्ये वरुण जान्हवीचं कान चावताना दिसतोय. याच फोटोवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘वरुण नेहमीच त्याच्या अशा वागणुकीमुळे चर्चेत असतो, त्याने आता सुधारलं पाहिजे’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘वरुण नेहमीच त्याच्या सह अभिनेत्रींसोबत असं काही करतो, ज्यामुळे तो ट्रोल होतो’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

Umm whattt by u/Worth_Put7897 in BollyBlindsNGossip

अमेरिकी सुपरमॉडेल गिगी हदिदला उचलून घेतल्याने झाला होता ट्रोल

नीता मुकेश अंबानींच्या सांस्कृतिक केंद्राच्या (NMACC) उद्घाटन कार्यक्रमातील वरुणचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या कार्यक्रमात स्टेजवर डान्स परफॉर्म करताना वरुणने अचानक अमेरिकन सुपरमॉडेल गिगी हदिदला बोलावलं आणि तिला उचलून घेतलं. त्यानंतर ती जेव्हा स्टेजवरून उतरत असते तेव्हा तो तिच्या गालावर किस करतो. वरुणचं हे वागणं नेटकऱ्यांना खटकलं होतं. त्यावरून त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

परवागनीशिवाय कियाराला किस केल्याने भडकला सिद्धार्थ मल्होत्रा

‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वरुण आणि कियारा एका फोटोशूटसाठी पोझ देत होते. त्यावेळी अचानक वरुणने कियाराच्या गालावर किस केलं. वरुणने अचानक किस केल्याचं पाहून क्षणभरासाठी कियारासुद्धा आश्चर्यचकीत होते. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव व्हायरल व्हिडीओत स्पष्ट दिसून आले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिद्धार्थने नाराजी व्यक्त केली होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सिद्धार्थ वरुणवर खूप रागावला होता. इतकंच नाही तर त्याने दिग्दर्शकांच्या सूचनेशिवाय कियाराला किस का केलं, यावरून प्रश्नही उपस्थित केला होता. वरुणमुळे कियारालाही सिद्धार्थच्या नाराजीचा सामना करावा लागला होता.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.