वरुण धवनने मुलीच्या जन्मानंतर शेअर केला क्यूट व्हिडीओ, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Varun Dhawan Baby Girl : नताशा - वरूण यांच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन, अभिनेत्याने क्यूट व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज... 3 जून रोजी नताशा हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. धवन कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे.
अभिनेता वरून धवन गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच वरुण याची पत्नी नताशा हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या आनंदाच्या बातमीला त्याचे आजोबा आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड धवन यांनी दुजोरा दिला. तेव्हापासून अर्जुन कपूर, करण जोहर आणि रकुल प्रीत सिंगसह सेलिब्रिटींनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. फक्त सेलिब्रिटी नाहीतर, चाहत्यांनी देखील वरुण आणि नताशा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मुलीच्या जन्मानंतर वरुण याने सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडीओ पोस्ट केले आहे. सध्या सोशल मीडियावर वरुण याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 4 जून रोजी खास व्हिडीओ पोस्ट करत वरूण याने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘आमचं बाळ आलं आहे.. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार मानतो… राम हरे राम, राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।’ असं लिहिलं आहे. अभिनेत्याने पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, 3 जून रोजी वरुण धवन याला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. अभिनेता वडील डेविड धवन यांना कारपर्यंत सोडण्यासाठी आला होता. तेव्हा अभिनेत्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. वरुण आणि डेविड धवण यांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातील, म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी नताशा आणि वरुण यांनी प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. अभिनेत्याने पत्नीसोबत एक फोटो पोस्ट केला होता. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘आम्ही प्रेग्नेंट आहोत… तुमचं प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे…’ असं लिहिल. तेव्हा देखील वरुण याच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.