वरूण धवण लेकीसोबत पहिला फोटो पोस्ट करत म्हणाला, ‘मुलीचा बाप होण्याचा आनंद म्हणजे…’
Varun Dhawan first photo with Daughter : मुलीच्या जन्मानंतर वरुण धवन याला वडिलांकडून मिळाला मोठा सल्ला, 'स्वतःच्या कुटुंबासाठी बाहेर जा आणि...', सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त वरूण धवन याने शेअर केलेल्या फोटोची चर्चा... अनेकांनी कमेंट करत दिली प्रतिक्रिया...
अभिनेता वरुण धवन गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याची पत्नी नताशा हिने काही दिवसांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे अभिनेत्यासाठी यंदाच्या वर्षाचा फादर्स डे खास आहे. फादर्स डेचं निमित्त साधत अभिनेत्याने लेकीसोबत एक फोटो पोस्ट केले आहे. सध्या सोशल मीडियावर वरुण याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर फक्त चाहते नाहीतर, सेलिब्रिटी देखील कमेंट करत प्रेम व्यक्त करत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्याने लेकीचा हात धरला आहे.
लेकीसोबत पहिला फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शमध्ये, ‘हॅप्पी फादर्स डे.… आजचा दिवस खास पद्धतीत साजरा करण्यासाठी माझ्या वडिलांनी मार्ग सांगितला आहे…. बाहेर जा आणि तुझ्या कुटुंबासाठी काम कर… मी सध्या तेच करत आहेत.. एका मुलीचा बाप होण्याचा आनंद फार वेगळा आहे. यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही…’ असं लिहिलं आहे.
View this post on Instagram
वरूण धवन याच्या पोस्टवर जान्हवी कपूर, सामंथा, मनीष पॉल, परिनीती चोप्रा यांनी देखील कमेंट करत अभिनेत्याला शुभेच्छा देत आहेत. प्रियांका चोप्रा पोस्टवर कमेंट करत म्हणाली, ‘मुलीचा बाप, वरुण धवन मोठा झालास रे तू…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, 3 जून रोजी वरुण धवन याला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा अभिनेत्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. वरुण याने सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केला. पण वरुण धवन आणि नताशा यांनी अजून मुलीच्या नावाची घोषणा केली नाहीये.
वरुण धवन याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘बेबी जॉन’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ए कालीस्वरन यांच्या खांद्यावर आहे. एटली जिओ स्टुडिओच्या सहकार्याने या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.