अभिनेत्रीचे प्रपोजल नाकारलं म्हणून वरुण धवनने खाल्ला मार; स्वत:च सांगितला तो किस्सा
वरुण धवनने एका अभिनेत्रीचं प्रपोजल नाकारलं होतं त्यामुळे त्याला बेदम मार खावा लागला होता. काही मुलांनी त्याला मारले होते जे त्या अभिनेत्रीचे मित्र होते, हा किस्सा वरुणने स्वत:च एका मुलाखतीत सांगितला आहे.
वरुण धवन त्याच्या अभिनयाने, चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. तसेच त्याच्या स्टाइलच्याही बऱ्याच चर्चा होतात. वरूण हा नेहमी कोणत्याही मुलाखतीत किंवा कार्यक्रमात अनेक किस्से सांगतना दिसतो. मग स्वत:बद्दल असो किंवा त्याच्या सहकलाकाराचा किस्सा असो. वरूणने अशाच एका मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेली मजेशीर किस्सा सांगितला.
प्रपोज केल्यावर अभिनेत्रीला वरुणने दिला होता नकार
वरुणला एका अभिनेत्रीने प्रपोज केलं होतं आणि त्याने ते नाकारलं होतं म्हणून त्याला चक्क मार खावा लागला होता. तीन ते चार मुलांनी मिळून वरूणला बेदम मारलं होतं. हा किस्सा सांगताना जिच्यामुळे वरुणला मार खावा लागला होता ती अभिनेत्रीही त्याच्यासोबत या मुलाखतीवेळी उपस्थित होती.
वरूण धवणने ज्या अभिनेत्रीमुळे मार खाल्ला होता ती अभिनेत्री होती श्रद्धा कपूर. वरूण आणि श्रद्धा कपूर हे लहानपणापासूनचे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या मैत्रीच्या काही मजेदार आठवणी आणि किस्से आहेत. नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत वरुण धवनने आणि श्रद्धा कपूरने आपल्या बालपणीच्या मजेदार आणि ‘फिल्मी’ किस्स्यांचा खुलासा केला.
श्रद्धाच्या प्रपोजलला नाही म्हटल्यानं वरुणने खाल्ला होता मार
श्रद्धाने एकदा सांगितले होते की, लहानपणी तिला वरुण खूप आवडत होता. वरूण हा श्रद्धाचा पहिला क्रश होता. तिने त्याला प्रपोजही केलं होतं, पण वरुणने तिला नकार दिला होता. वरुणने सांगितलं की, ते दोघं 8 वर्षांचे असताना श्रद्धा त्याला प्रेम व्यक्त करण्यासाठी डोंगरावर घेऊन गेली होती आणि तिने मला प्रपोज केले होते.
वरुणने पुढे सांगितलं की, श्रद्धाच्या दहाव्या वाढदिवसाच्या पार्टीत ती फ्रॉक घालून आली होती आणि तिने त्याला पार्टीत आमंत्रित केलं होतं. त्यावेळी जवळपास तीन ते चार मुलं होती ज्यांना श्रद्धा खूप आवडत होती.
View this post on Instagram
वरुण म्हणाला, ‘मी जंपिंग बॅगवर खेळत होतो, तेव्हा त्या मुलांनी मला विचारलं, ‘तुला श्रद्धा का आवडत नाही? तेव्हा मी त्यांना सांगितलं की, मला मुलींमध्ये रस नाही, फक्त नृत्य स्पर्धेत इंटरेस्ट आहे.’ त्यावर त्या मुलांनी त्याला ‘नाही, तुला ती आवडायलाचं पाहिजे’ असं सांगितलं आणि मी नाही म्हणाल्यामुळे त्या मुलांनी त्याला मारहाण केली होती”
वरुण धवन आणि श्रद्धा कपूर पुन्हा कोणत्या चित्रपटात?
हा किस्सा सांगत असताना श्रद्धा आणि वरूण दोघेही त्या आठवणी आठवून हसत होते .तसेच वरुणने अजून एका किस्सा सांगितला वरुण श्रद्धाच्या शाळेत दांडिया स्पर्धेत दांडिया खेळायला गेलेला असतानाचा घडलेला प्रसंगही त्याने सांगितला.
आजवर वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि त्यांची जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अलीकडेच श्रद्धाच्या ‘स्त्री 2’ मध्ये वरुणने भेडियाच्या रुपात कॅमिओ देखील केला होता, ज्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.आता हे दोघे पुन्हा एकत्र कोणत्या चित्रपटात दिसणार आहेत याची प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे.