तुनिषा शर्मा प्रकरणात शिझान खान याला दिलासा; इतक्या रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

तुनिषा शर्मा प्रकरणातील मुख्य आरोपी शिझान खान याला दिलासा; गेल्या अडीच महिन्यापासून अभिनेता होता ठाणे मध्यवर्ती कारागृहात....

तुनिषा शर्मा प्रकरणात शिझान खान याला दिलासा; इतक्या रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 1:48 PM

Sheezan Khan : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान (Sheezan Khan) वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण आता तुनीषा आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिझान खान याचा शनिवारी जामीन मंजूर झाला आहे. आत्महत्या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर अभिनेत्याला जवळपास अडीच महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे. 2 फेब्रुवारी रोजी वसई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. देशपांडे यांच्या समोर झालेल्या युक्तिवादनंतर न्यायालयाने 4 मार्च रोजी निकाल दिला आहे.

शनिवारी दुपारी २ वा. नंतर निकालाची कॉपी मिळाल्यानंतरच शिझानला कोणत्या अटी नियमानुसार जामीन मंजूर झाला हे कळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे शिझान याला १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर येत आहे. शिझान गेल्या अडीच महिन्यापासून ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.

‘अली बाबा: दास्तान ए काबुल’ मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीने आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. तुनिषा हिने शिझान खान याच्या मेकअप रुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला. मुलीच्या आत्महत्येनंतर तुनिषा हिच्या आईने शिझान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

हे सुद्धा वाचा

तुनिषा शर्मा हिच्या आईने केलेल्या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी शिझान याला अटक केली. शिझान याला अटक झाल्यानंतर अभिनेत्याच्या कुटुंबियांनी देखील तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप केले. तुनिषाच्या आत्महत्येनंतर शिझान याच्या अडचणीत सतत वाढ होत असल्याचं चित्र दिसत होतं. पण आता अभिनेत्याला दिलासा मिळाला आहे.

तुनिशाचं बॉलिवूडमध्ये (bollywood) पदार्पण तुनिशाने फक्त मालिकांमध्येच नाही, तर सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तुनिषाने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ आणि ‘दबंग 3′ या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.